Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI ने 'या' बँकेचा परवाना रद्द केल्यावर ग्राहकांची उडाली होती तारांबळ!

RBI Cancelled Bank License: अमेरिकेतील दोन मोठ्या बँका बुडण्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाली.

Manish Jadhav

RBI Cancelled Bank License: अमेरिकेतील दोन मोठ्या बँका बुडण्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाली. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. पण तुम्हाला आठवत असेल की, रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एका बँकेचा परवाना रद्द केला होता. यानंतर ग्राहकांना पैसे काढून बँकेशी संबंधित काम मार्गी लावण्याची तारीख देण्यात आली होती.

बँकांना विविध सूचना

आरबीआयकडून (RBI) संबंधित बँकांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जातात. या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकांवर दंड आकारला जातो. मात्र यापूर्वी मध्यवर्ती बँकेने एका बँकेचा परवाना रद्द केला होता. यानंतर 22 सप्टेंबर 2022 पासून बँक बंद होती.

सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला

ऑगस्ट 2022 मध्ये, RBI ने पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 22 सप्टेंबर 2022 पासून बँकेची बँकिंग सेवा बंद करण्यात आली. यानंतर लोकांनी बँकेत (Bank) जमा केलेले पैसे त्वरीत काढून घेतले. पण तरीही काही लोक असे होते, ज्यांना पैसे काढता आले नाहीत.

परवाना का रद्द केला?

रिझर्व्ह बँकेने त्यावेळी सांगितले होते की, बँक 22 सप्टेंबर 2022 पासून आपला व्यवसाय बंद करेल. यानंतर ग्राहक (Customer) त्यांचे पैसे जमा किंवा काढू शकणार नाहीत. याशिवाय, तुम्ही कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करु शकणार नाही. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि पुढील कमाईची क्षमता नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले. या कारणास्तव बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT