Whatsapp Tips Dainik Goomantak
अर्थविश्व

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅपमध्ये चुकूनही करू नका 'या' 6 चुका, अन्यथा अकाउंट होईल बॅन

तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

व्हॉट्सअॅप हे सोशल मिडियावरील प्लॅटफॉर्म जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याचे वापरकर्तेही अधिक आहेत. परंतु, काही लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या कामांसाठी वापर करतात.

यामुळे कंपनी वेळोवेळी लाखो अकाउंट ब्लॉक करते. भारतातच व्हॉट्सअॅपद्वारे दरमहा लाखो खाती बॅन केली जातात. तसे, हा प्लॅटफॉर्म एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. परंतु, अनेक प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपस्थितीमुळे, कंपनी खराब खाती शोधते. आम्ही येथे त्या कारणांवर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमचे अकाउंट देखील ब्लॉक होऊ शकते.

व्हॉट्सअॅपने फेक न्यूजशी लढा देण्यासाठी फॉरवर्ड मॅसेजचे लेबल लावणे सुरू केले आहे आणि फॉरवर्ड करण्याची मर्यादाही कमी केली आहे. यामुळे जर तुम्हाला कोणत्याही संदेशाच्या विश्वासार्हतेबद्दल शंका असेल तर तो फॉरवर्ड करणे टाळा. बरेच किंवा सर्व मॅसेज फॉरवर्ड केल्याने तुमचे खाते रडारवर येऊ शकते.

  • बल्क मॅसेजिंग टाळा

व्हॉट्सअॅप लोकांना बल्क मॅसेजिंग टाळण्याचा सल्लाही देते. यासाठी व्हॉट्सअॅप मशीन लर्निंगचा वापर करते. तसेच, वापरकर्त्याच्या अहवालाच्या आधारे ते अवांछित संदेश पाठविणाऱ्यांवर कारवाई करते.

  • ब्रॉडकास्ट लिस्टचा अधिक वापर

ब्रॉडकास्ट वैशिष्ट्याचा वापर एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत समान मॅसेज पोहोचवण्यासाठी केला जातो. परंतु, तुम्ही या फिचरचा जास्त वापर केल्यास, लोक तुमची तक्रार करू शकतात आणि तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते.

whats app
  • परवानगीशिवाय ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट जोडणे

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सुचवते की त्यांच्या परवानगीनंतरच एखाद्या कॉन्टॅक्टचा ग्रुपमध्ये समावेश करावा. जर कोणी तुम्हाला अॅड केल्यानंतर वारंवार एक्झिट घेत असेल किंवा तुम्हाला मॅसेज करण्यास नकार देत असेल, तर तुम्ही तसे करणे टाळावे.

  • अनोळखी कॉन्टॅक्ट नंबरवर मॅसेज करू नका

व्हॉट्सअॅपवर फक्त तुमच्या ओळखीच्या लोकांनाच मॅसेज करावे . कोणत्याही अनोळखी नंबरवर मॅसेज करणे टाळा.

  • व्हॉट्सअॅपच्या नियमांचे पालन करा

प्लॅटफॉर्मसाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यावरही तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते. यामुळे तुम्ही अफवा पसरवणे, चुकीची माहिती पसरवणे, कोणालाही त्रास देणे किंवा बेकायदेशीर काम करणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT