WhatsApp Dainik Gomantak
अर्थविश्व

WhatsApp New Update: व्हॉट्सॲपमध्ये लवकरच येणार खास फिचर्स; व्हिडिओ कॉलसोबत घेता येणार म्युझिकचा आनंद!

WhatsApp आणखी एक खास फीचर घेऊन येत आहे, ज्यानंतर तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगसह ऑडिओ म्यूझिक शेअर करु शकाल.

Manish Jadhav

WhatsApp सध्या एका नवीन फिचर्सवर काम करत आहे. व्हॉट्सॲपने काही महिन्यांपूर्वीच व्हिडीओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचे फीचर आणले होते, त्यानंतर आता गुगल मीट आणि झूम प्रमाणे यूजर्स व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअर करु शकतात. यातच आता WhatsApp आणखी एक खास फीचर घेऊन येत आहे, ज्यानंतर तुम्ही व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगसह ऑडिओ म्यूझिक शेअर करु शकाल. हे नवीन फीचर WhatsApp च्या iOS बीटा व्हर्जन 23.25.10.72 वर दिसणार आहे. सध्या हे फिचर्स टेस्टिंग मोडमध्ये आहे.

दरम्यान, WABetaInfo ने याबाबत अपडेट दिली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे फीचर आयफोन यूजर्ससाठी सर्वात आधी लॉन्च केले जाईल. हे फीचर लॉन्च केल्यानंतर आयफोन यूजर्स व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन आणि ऑडिओ म्यूझिक देखील शेअर करु शकतील.

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मित्रांसह व्हिडिओ कॉलवर असाल आणि तुमची स्क्रीन शेअर करत असाल, तर तुम्ही त्यांना बॅकग्राउंडमध्ये तुमचे काही आवडते म्यूझिक ऐकायला लावू शकता.

दरम्यान, याचा फायदा असा होईल की स्क्रीन शेअरिंग दरम्यान यूजर्स व्हिडिओ कॉलवर म्युझिक देखील ऐकू शकतील. या फीचरबाबत रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, हे फीचर व्हॉईस कॉलवर काम करणार नाही. याशिवाय, व्हिडिओ कॉलदरम्यान व्हिडिओ डिसेबल केल्यावरही हे फिचर्स काम करणार नाही. दुसरीकडे, व्‍हॉट्सॲपने यावर्षी ऑगस्टमध्‍ये व्‍हिडिओ कॉलदरम्यान स्‍क्रीन शेअरिंगचे फिचर लॉन्च केले होते. व्हॉट्सॲप हळूहळू मुख्य प्रवाहातील व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूमशी स्पर्धा करण्यासाठी तयार होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: "भारतीय चित्रपट निर्मात्यांना लाज वाटली पाहिजे" कांतारा चॅप्टर 1 पाहिल्यानंतर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

Illegal Beef Trafficking: मोले चेकपोस्टवर 800 किलो गोमांस जप्त! हुबळीहून मडगावकडे बेकायदेशीर मांस वाहतूक; गोवा पोलिसांची मध्यरात्री कारवाई

घर खरेदी करताय? सावधान! 'RERA'चा महत्त्वाचा निर्णय; कराराआधी अधिक रक्कम दिल्यास 'नुकसान भरपाई' नाही

Israel Attack: गाझावर इस्रायलचा क्रूर हल्ला; बॉम्बहल्ल्यात 70 जण ठार, मृतांमध्ये 7 निष्पाप चिमुकल्यांचाही समावेश Watch Video

West Bengal Landslide: दार्जिलिंगमध्ये पावसाचं रौद्ररूप! भूस्खलनाने हाहाकार; लोखंडी पूल कोसळला, अनेकांचा मृत्यू Watch Video

SCROLL FOR NEXT