WhatsApp New Feature: पास कीमुळे चॅट होणार अधिक सुरक्षित; व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले दमदार फिचर

लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म असलेले व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एकापाठोपाठ एक नवीन फीचर्स लाँच करत आहे.
WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureDainik Gomantak

WhatsApp New Feature: लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म असलेले व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एकापाठोपाठ एक नवीन फीचर्स लाँच करत आहे.  व्हॉट्सअ‍ॅप अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल लाँच केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सचे अकाउंट अधिक सुरक्षित राहावे यासाठी Passkey नावाचे एक खास फीचर लाँच केले आहे. येत्या आठवड्यात हे फिचर यूजर्ससाठी उपलब्ध होईल. 

व्हॉट्सअ‍ॅपने X वर पोस्ट शेअर करत माहिती दिली की तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट आता अधिक सुरक्षित होणार आहे. कारण आता Passkey हे फिचर लाँच होणार आहे. हे फिचर Android यूजर्स देखील वापरू शकणार आहेत. या फिचरमुळे यूजर्स सुरक्षितरित्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट लॉग इन करू शकता.

या फिचरमुळे यूजर्संना आता कोणताही पासवर्ड किंवा ओटीपी न टाकता अखाउंट लॉग इन करता येणार आहे. फक्त फिंगरप्रिंट, फेस-आयडी किंवा पिनच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ओपन करता येणार आहे.

या नव्या फिचरचे टेस्टिंग पुर्ण झाले आहे. हे फिचर अँड्रॉइड अ‍ॅपचा भाग बनण्यास सज्ज झाले आहे. येत्या आठवड्यात यूजर्स ios आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील या नव्या फिचरचा आनंद घेऊ शकणार आहेत.

अशी कराल सेटिंग

पहिले व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड करा आणि नंतर अपडेट करावे लागेल.

यासाठी तुम्हाला गुगल पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

नंतर व्हॉट्सअ‍ॅपमधील सेटिंगमध्ये जावे

नंतर पास की ऑप्शन सिलेक्ट करावा. नंतर त्यावर टॅप करावे.

पास की तयार करा आणि बटणावर क्लिक करा.

नंतर नवीन पॉपअप विंडो ऑप्शनवर टॅप करा.

यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप पॉपअप विंडोसाठी पास की तयार करा बटणावर टॅप करावे लागेल.

आता व्हॉट्सअ‍ॅपअकाउंट लॉग इन करतांना तुम्ही पास की चा वापर करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com