Vivo V60 5g Launch: विवोने भारतीय मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका केला. कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V60 लॉन्च केला. मिड-रेंज सेगमेंटमध्ये हा फोन असून दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 6500mAh बॅटरी, 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर अशा दमदार क्वालिटीसह हा फोन लॉन्च झाला. कंपनीने या फोनसाठी 4 वर्षांचे OS अपग्रेड आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, फोनमध्ये AI स्मार्ट कॉल असिस्टंट, AI इमेज एक्सपेंडर, AI पावर्ड ब्लॉक स्पॅम कॉल टूल आणि AI कॅप्शनसारखे अनेक एआय फीचर्सही मिळतात.
दरम्यान, या लेटेस्ट विवो मोबाईलचे चार व्हेरिएंट्स बाजारात आले आहेत. त्यांची किंमत खालीलप्रमाणे आहे:
8GB RAM / 128GB स्टोरेज: ₹36,999
8GB RAM / 256GB स्टोरेज: ₹38,999
12GB RAM / 256GB स्टोरेज: ₹40,999
16GB RAM / 512GB स्टोरेज: ₹45,999
या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली असून, 19 ऑगस्टपासून विवोच्या अधिकृत वेबसाइट निवडक रिटेल स्टोअर्स, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर (Amazon) याची विक्री सुरु होईल. बाजारात या फोनची टक्कर Realme 15 Pro 5G, Google Pixel 8a, OnePlus 13R 5G, iQOO Neo 10 आणि Honor 200 Pro 5G सारख्या स्मार्टफोन्सशी असेल.
डिस्प्ले: यात 6.77 इंच 1.5K रिझोल्यूशन असलेला क्वाड कर्व्हड अॅमोलेड डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
प्रोसेसर: हा फोन 4nm वर आधारित स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो.
रॅम आणि स्टोरेज: यात 16GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज दिले आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित फनटच OS 15 वर काम करतो.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर, 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड-अँगल लेन्स समाविष्ट आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. विशेष म्हणजे, या फोनचा फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरा सेन्सर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
बॅटरी: यात 6500mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.