IND vs NAM
IND vs NAMDainik Gomantak

IND vs NAM: "टीम इंडियाला झुकतं माप का?" टी-20 वर्ल्ड कपमध्ये वादाची ठिणगी!नामिबियाच्या कर्णधाराचा 'ICC'वर गंभीर आरोप

T20 World Cup 2025: टी२० विश्वचषक २०२६ च्या रणधुमाळीत आता मैदानाबाहेरील वादही रंगू लागले आहेत.
Published on

Namibia captain ICC allegation : टी२० विश्वचषक २०२६ च्या रणधुमाळीत आता मैदानाबाहेरील वादही रंगू लागले आहेत. गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध नामीबिया या सामन्यापूर्वी नामीबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याने आयोजकांवर (ICC) पक्षपाताचे आरोप केले आहेत. भारताला सरावासाठी विशेष सवलती दिल्या जात असून नामीबियाला मात्र दुय्यम वागणूक मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे.

सरावाच्या वेळापत्रकावरून आयसीसीवर निशाणा

इरास्मसने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला रात्रीच्या वेळी (फ्लडलाईट्समध्ये) दोन सराव सत्रे देण्यात आली, तर नामीबियाला दोन्ही सराव सत्रे दिवसा देण्यात आली. विशेष म्हणजे नामीबियाने आपला शेवटचा सामना दिवसा खेळला होता, तरीही त्यांना रात्रीच्या प्रकाशात सराव करण्याची संधी नाकारण्यात आली.

"मला माहित नाही असं का घडतंय, पण भारताला रात्रीचा सराव मिळतोय आणि कॅनडासारख्या संघांनाही ती सोय उपलब्ध आहे. तुम्ही यातून जो अर्थ काढायचा तो काढा, पण आम्ही मैदानात आमच्या पद्धतीने (नामीबियन स्टाईलने) लढू," असे इरास्मसने टोमणे मारत स्पष्ट केले.

IND vs NAM
Goa Sexual Assault Case: बाबूश मोन्सेरात यांची 9 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; 2016 च्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

सुविधांचा अभाव

नामीबियामध्ये फ्लडलाईट्समध्ये खेळण्याच्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळेच भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रात्रीच्या प्रकाशात सराव करणे त्यांच्यासाठी तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. नामीबियाचे खेळाडू 'नेपाळ प्रीमियर लीग' किंवा 'ILT20' सारख्या स्पर्धांचा अपवाद वगळता फ्लडलाईट्समध्ये खेळण्यास सरावलेले नाहीत. अशा परिस्थितीत सरावासाठी समान संधी न मिळणे हे नामीबियासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

IND vs NAM
Goa Matrimonial Fraud: मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणं पडलं महागात; 'लंडन'च्या भामट्याकडून चिंबलच्या महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा!

नामीबियाची 'करो या मरो' स्थिती

नीदरलँड्सविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर नामीबियाची स्थिती कठीण झाली आहे. यानंतर त्यांना अमेरिका आणि पाकिस्तानचा सामना करायचा आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ आता कोणत्याही स्थितीत नामीबियाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. नामीबियाकडे गमावण्यासारखे काही नसले, तरी आयसीसीच्या या नियोजनामुळे स्पर्धेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com