Vivo Y400 5G
Vivo Y400 5GDainik Gomantak

Vivo चा 50MP कॅमेरा अन् 6,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च, किंमत किती? फीचर्स काय? वाचा…

Vivo Y400 5G Launch In India: Vivo कंपनीने भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन Vivo Y400 5G लाँच केला आहे. हा फोन पॉवरफुल बॅटरी, वॉटरप्रूफ रेटिंग आणि प्रीमियम फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Published on

Vivo कंपनीने भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन Vivo Y400 5G लाँच केला आहे. हा फोन पॉवरफुल बॅटरी, वॉटरप्रूफ रेटिंग आणि प्रीमियम फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. जून महिन्यात कंपनीने या मालिकेतील प्रो मॉडेल बाजारात आणले होते. आता Y400 5G मॉडेल Vivo T4 5G च्या किमतीच्या रेंजमध्ये येतो, पण यात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

किंमत आणि व्हेरिएंट्सच्या बाबतीत बोलायचे झाले, तर Vivo Y400 5G दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत ₹21,999 ठेवण्यात आली आहे.

तर टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असून त्यासाठी ग्राहकांना ₹23,999 मोजावे लागतील. कंपनीने हा फोन दोन स्टायलिश रंगांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ग्लॅम व्हाइट आणि ऑलिव्ह ग्रीन, जे वापरकर्त्यांना एक प्रीमियम लुक आणि फील देतात.

Vivo Y400 5G
Goa Leopard: रात्री 11 वाजता कुत्र्याला पळवले, शिगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांची उडाली झोप

ऑफर्स

या फोनची विक्री 7 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. विक्री Flipkart, Amazon आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटसह ऑफलाइन स्टोअर्सवर होईल. खरेदीदारांना यावर 10% कॅशबॅक, डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI सारख्या ऑफर्स दिल्या जातील.

Vivo Y400 5G
Goa Crime: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त, जम्मू काश्मीरच्या एकाला अटक

डिस्प्ले आणि डिझाइन

Vivo Y400 5G मध्ये 6.67-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz हाय रिफ्रेश रेट आणि 1800 nits ब्राइटनेस सपोर्ट करतो. फोनमध्ये पंच-होल डिझाइन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, ज्यामुळे त्याला प्रीमियम लुक मिळतो.

Vivo Y400 5G
Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

परफॉर्मन्स

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरवर चालतो. यात 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट आहे. याशिवाय, मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. हा फोन Android 15 आधारित FuntouchOS 14 वर काम करतो.

बॅटरी आणि चार्जिंग

Vivo Y400 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्यामुळे फोन काही मिनिटांत चार्ज होतो आणि दिवसभर वापरता येतो.

Vivo Y400 5G
Goa Leopard: रात्री 11 वाजता कुत्र्याला पळवले, शिगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांची उडाली झोप

कॅमेरा

Vivo Y400 5G मध्ये उत्कृष्ट कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सिस्टम असून त्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे, ज्यामुळे पोर्ट्रेट शॉट्स अधिक स्पष्ट आणि नेमके येतात. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाआहे.

वॉटरप्रूफ रेटिंग

या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग आहे, ज्यामुळे तो पाण्यात बुडाल्यानंतरही सुरक्षित राहतो. हे फीचर त्याला प्रीमियम कॅटेगरीत वेगळं बनवतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com