Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Train: काश्मीर खोऱ्यात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनबाबत अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

Ashwini Vaishnaw: देशातील प्रीमियम सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन पुढील वर्षापासून काश्मीर खोऱ्यात धावणार आहे.

Manish Jadhav

Indian Railway: प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे सातत्याने काम करत आहे. यातच आता, देशातील प्रीमियम सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन पुढील वर्षापासून काश्मीर खोऱ्यात धावणार आहे. विशेष म्हणजे, काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रशासित प्रदेशाबाबत ते म्हणाले की, खास वंदे भारत ट्रेन तयार केली जात आहे. ही स्पेशल ट्रेन बनवताना तापमान, बर्फ या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यात आल्या आहेत.

वास्तविक, जम्मू ते श्रीनगरला (Srinagar) जोडणारी उधमपूर बनिहाल लाईन या वर्षी डिसेंबरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण होईल.

केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले की, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गावर चांगला विकास झाला आहे. चिनाब आणि अंजी पूल आणि महत्त्वाचे बोगदे बांधण्याचे कामही सुरु आहे.

यावर्षी डिसेंबरमध्ये किंवा पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या मार्गावर गाडी धावण्यास सुरुवात होईल. या मार्गासाठी खास वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येत आहे.

या भागांना जोडण्याची मागणी करण्यात आली

सोपोर कुपवाडा, अवंतीपुरा-शोपियन आणि बिजबेहारा-पहलगाम या तीन भागांना रेल्वेमार्गाने जोडण्याची मागणी करण्यात आली असून रेल्वे त्यावर विचार करेल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

वैष्णव म्हणाले की, आम्ही जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरशी बोलू. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत चर्चा करु. बारामुल्लामधील लाईन डबल करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लाईनला आणखी तीन कनेक्शन जोडले जाणार आहेत.

विशेष म्हणजे, या मार्गावर अनेक कामे पूर्ण झाली आहेत. विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एलओसीपर्यंत लाईन वाढवण्याबाबतही एलजीशी चर्चा होईल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या दौऱ्यावर असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांसह बडगाम स्टेशन ते बारामुल्ला असा रेल्वेने प्रवास केला. या दोन दिवसांत रेल्वेमंत्री काश्मीरमधील रेल्वे प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT