Vande Bharat train
Vande Bharat trainDainik Gomantak

Vande Bharat Express Train: 'या' राज्यात धावणार पुढची वंदे भारत एक्सप्रेस, घोषणेनंतर...

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. ही एक सेमी-हाय-स्पीड-ट्रेन आहे.

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. ही एक सेमी-हाय-स्पीड-ट्रेन आहे. लवकरच दक्षिण भारतात देशाची पुढील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही देशातील 12वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे, जी चेन्नई ते कोईम्बतूरपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत वंदे भारत ट्रेन चेन्नई ते म्हैसूर या मार्गावर धावत होती, परंतु ही राज्यातील दुसरी सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे जी चेन्नई ते कोईम्बतूरपर्यंत धावेल.

महाराष्ट्रात सर्वाधिक वंदे भारत

देशात अशी अनेक राज्ये आहेत, जी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये बिहार आणि झारखंड (Jharkhand) या राज्यांचाही समावेश आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 8 एप्रिल रोजी पीएम मोदी चेन्नई ते कोईम्बतूरपर्यंत धावणाऱ्या सेमी-हाय-स्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात.

याआधी, देशातील 11वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली ते जयपूर धावणार आहे. ही ट्रेन आल्यानंतर दिल्ली ते जयपूर हा प्रवास सुमारे 3 तासात पूर्ण होईल. विशेष म्हणजे, देशात सर्वाधिक वंदे भारत गाड्या महाराष्ट्रात धावतात, ज्यांची एकूण संख्या 4 आहे.

 Vande Bharat train
Vande Bharat Express: 2024 पर्यंत देशाला मिळणार 67 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी सांगितला प्लॅन

पहिली वंदे भारत कुठे सुरु झाली

देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन वाराणसी ते दिल्ली (Delhi) धावली, ज्याला पंतप्रधान मोदींनी हिरवी झेंडा दाखवला. यानंतर दिल्ली ते कटरा या ट्रेनची सुविधा सुरु करण्यात आली. अशी अनेक राज्ये आहेत, जिथे या ट्रेनची प्रतीक्षा आहे.

बिहार, झारखंड, पंजाब, उत्तराखंड, ईशान्य आणि ओडिशाला अद्याप ही ट्रेन मिळालेली नाही. वंदे भारत या नव्या युगाविषयी सांगायचे झाल्यास, ती पहिल्यांदा मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com