Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat: 'या' राज्यातील लोकांसाठी मोठी बातमी, लवकरच मिळणार पाच ते सहा वंदे भारत ट्रेन?

Vande Bharat, Indian Railways: देशातील अनेक राज्यांना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे. नुकतीच केरळला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली.

Manish Jadhav

Vande Bharat, Indian Railways: देशातील अनेक राज्यांना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे. नुकतीच केरळला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेशलाही या महिन्यात पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे.

सेमी हायस्पीड ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ तर वाचतोच शिवाय त्यांना ट्रेनमध्ये आलिशान सुविधाही मिळते. त्यामुळे या गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंगही जोरात सुरु आहे.

आता इंटिग्रल कोच फॅक्टरीचे माजी महाव्यवस्थापक सुधांशू मणी यांनी दावा केला आहे की, केरळला येत्या दोन वर्षांत पाच ते सहा वंदे भारत ट्रेन मिळू शकतात.

दरम्यान, वंदे भारत ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावू शकेल, यासाठी विद्यमान रेल्वे ट्रॅक अपग्रेड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी 'मनोरमा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. हे शक्य नसलेल्या काही ठिकाणी नवीन रेल्वे रुळ टाकावे लागणार आहेत.

देशात हायस्पीड रेल्वे आणि सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भरपूर वाव आहे. रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे सहा ते आठ पट अधिक पर्यावरणपूरक आहे, हे समजून घेतले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, केरळला (Kerala) येत्या दोन वर्षांत पाच ते सहा वंदे भारत ट्रेन मिळू शकतात.

त्याचबरोबर, वंदे भारत ट्रेनमधील खाद्यपदार्थ इतर गाड्यांपेक्षा खूपच चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. IRCTC ने स्थिती आणखी सुधारली पाहिजे कारण लोक खूप जास्त भाडे देत आहेत.

भविष्यात अॅल्युमिनियमचे डबे असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 200 किलोमीटरपर्यंत वाढवता येईल, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.

सध्या वंदे भारत गाड्यांचा कमाल वेग 160-180 किमी प्रतितास आहे. या गाड्या अनेक मार्गांवर कमी वेगाने धावत असल्या तरी वंदे भारतचा वेग देशातील इतर गाड्यांपेक्षा खूपच जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Tiger Reserve: 1 लाख विस्थापनाचा आकडा सिद्ध करणारी फाईलच गायब! वाघांचे आणि स्थानिकांचे भविष्य..

दवाखाण्यात पोहोचण्यापूर्वीच मुलाने कुशीत दम तोडला; काळीज तुटलेल्या बापाला हृदयविकाराचा झटका आला

Shristhal: श्रीस्थळ येथे जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी! दोन्ही गटांच्या तक्रारी दाखल; महिलेचा विनयभंग झाल्याचा दावा

Xeldem: 'गोव्यातील शिक्षण, संस्कृती 'मराठी'मुळेच टिकून', वेलिंगकरांचे प्रतिपादन; शेल्‍डेत मराठी राजभाषा निर्धार मेळावा

SCROLL FOR NEXT