Vande Bharat New Route: रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्युज, आता 'या' तीन मार्गांवर धावणार वंदे भारत

आत्तापर्यंत देशातील विविध मार्गांवर सुमारे 11 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Vande Bharat Express New Route: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत काम करत आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विविध मार्गांवर वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्यास सुरुवात केली आहे. 

आतापर्यंत देशातील विविध मार्गांवर सुमारे 11 वंदे भारत गाड्या धावत आहेत. नुकतीच भोपाळ-नवी दिल्ली वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. आता पश्चिम बंगालला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळणार आहेत आणि चौथ्या ट्रेनसाठीही चर्चा सुरू आहे.

  • पहिल्या वंदे भारत ट्रेनला लोकांना पसंती
    राज्यातील पहिली वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची पसंती मिळाली आहे. 100-130 किमी प्रतितास वेगाने धावणारी, हाय-स्पीड ट्रेन हावडा आणि न्यू जलपाईगुडी स्टेशन दरम्यानचे अंतर कापण्यासाठी फक्त साडेसहा तास घेते. 

    ईशान्य रेल्वेचे (Railway) जीएम अरुण अरोरा म्हणाले की पश्चिम बंगालला लवकरच किमान तीन नवीन वंदे भारत ट्रेन (Vande Bhart Train) मिळतील.

Vande Bharat Express
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत चढउतार; जाणून घ्या आजचे दर...
  • कमाल वेग 160 किमी प्रतितास असेल


    वन्दे भारतचा कमाल वेग ताशी 160 किमीपर्यंत वाढवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ट्रॅकच्या दोन्ही बाजूला कुंपण घालण्यासाठी राज्य सरकारची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत संपूर्ण ट्रॅकवरून अतिक्रमण हटवले जात नाही, तोपर्यंत ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकत नाही.

    नुकतीच वंदे भारत ट्रेन नवी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन आणि भोपाळच्या राणी कमलापती स्टेशन दरम्यान सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनने 161 किमी प्रतितास वेग गाठला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com