UPI Payment | UPI Goes Global Dainik Gomantak
अर्थविश्व

UPI Goes Global: UPI आता परदेशातही, 'या' 10 देशांत राहणाऱ्या भारतीयांना मिळणार सुविधा

परदेशात राहणाऱ्या भारतीयांना लवकरच आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरद्वारे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरण्याची सुविधा मिळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

UPI Goes Global: परदेशात राहणाऱ्या भारतीयांना लवकरच आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरद्वारे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरण्याची सुविधा मिळणार आहे. विविध दहा देशांत राहणाऱ्या अनिवासी भारतीय (एनआरआय) त्यांच्या भारतीय फोन नंबरवर अवलंबून न राहता आर्थिक व्यवहारांसाठी UPI सेवा वापरू शकतील.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक असलेले NRE/NRO (Non Resident External and Non Resident Ordinary) UPI द्वारे आर्थिक व्यवहार करू शकतील. पेमेंट्स कॉर्पोरेशनने भागीदार बँकांना निर्देशांचे पालन करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने बुधवारी RuPay डेबिट कार्ड आणि BHIM-UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 2,600 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. UPI बाबतच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, परदेशात राहणारे कुटुंबे आणि स्थानिक व्यवसायांना मदत होणार आहे.

या योजनेअंतर्गत, RuPay आणि UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल. बुधवारी एका ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले, "रूपे डेबिट कार्ड आणि भीम-यूपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा आजचा मंत्रिमंडळ निर्णय भारताला डिजिटल पेमेंटमध्ये आणखी पुढे घेऊन जाईल." विशेष म्हणजे, डिसेंबरमध्ये 12 लाख कोटी रुपयांचे UPI व्यवहार झाले आहेत.

कोणत्या देशात वापरता येणार सुविधा?

सिंगापूर, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि युनायटेड किंगडम (UK).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT