Arvind Kejriwal: दहा दिवसात 164 कोटी द्या; अरविंद केजरीवाल यांना वसुलीची नोटीस

दिल्लीतील सत्ताधारी 'आप'ने 10 दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक आहे.
CM Arvind Kejriwal
CM Arvind KejriwalDainik Gomant

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 164 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस मिळाली आहे. दिल्ली सरकारच्या डीआयपी (Delhi Govt. DIP) सचिवांनी ही वसुली नोटीस पाठवली आहे. तसेच 10 दिवसांच्या आत रुपये जमा करण्यास सांगितले आहे.

CM Arvind Kejriwal
Anjuna Crime: मद्यधुंद बिहारींच्‍या मारहाणीतील जखमीचा गोमेकॉत मृत्‍यू

सरकारी जाहिरातींच्या आडून राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप आम आदमी पार्टीवर करण्यात आला आहे. त्यासाठी आपला 163.62 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना (V.K. Saxena) यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या निर्देशानंतर दिल्ली सरकारच्या माहिती आणि प्रचार संचालनालयाने ही नोटीस जारी केली आहे. दिल्लीतील सत्ताधारी 'आप'ने 10 दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक आहे.

CM Arvind Kejriwal
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी सर्वपक्षीय बैठक कधी बोलावली?

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मुदतीत रक्कम भरली नाही तर त्यांची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या नोटिशीला आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

दरम्यान, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी 2015-2016 दरम्यान सरकारी जाहिरातींच्या नावाखाली प्रसिद्ध झालेल्या राजकीय जाहिरातींसाठी 'आप'कडून 97 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते. मात्र आता ही रक्कम वाढवून 164 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यात या रकमेवरील व्याजाचाही समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com