Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

FD Interest Rates: 'या' 2 बँकांनी दिलं मोठं गिफ्ट, या योजनेत सुकन्या समृद्धीपेक्षा जास्त मिळतयं व्याज!

Highest FD Interest Rates: तुम्हीही एफडीचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी गिफ्टपेक्षा कमी नाही.

Manish Jadhav

Highest FD Interest Rates: तुम्हीही एफडीचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी गिफ्टपेक्षा कमी नाही. होय, Unity आणि Suryoday Small Finance Bank द्वारे FD वर 9 टक्क्यांहून अधिक व्याज दिले जात आहे.

PPF (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) यांसारख्या गुंतवणूक योजनांपेक्षा या दोन्ही लघु वित्त बँकांद्वारे ऑफर केलेल्या FD वरील व्याजदर खूपच जास्त आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक 4.5% ते 9% दरम्यान व्याज देते. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.5% वार्षिक व्याज देत आहे. हे व्याज 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर दिले जात आहे.

त्याचवेळी, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Investors) हा व्याज दर 9% आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीत ठेवींवर बँकेकडून 4.5% ते 9.5% पर्यंत व्याजदर मिळतात. बँकेने 14 जून 2023 पासून व्याजदरात बदल केला आहे.

- 1001 दिवसांच्या ठेवींवर 9.00% व्याज (सामान्य ग्राहक)

- 1001 दिवसांच्या ठेवींवर 9.50% व्याज (ज्येष्ठ नागरिक)

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4% ते 9.1% पर्यंत व्याज देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर बँकेकडून 4.5% ते 9.6% व्याज मिळते. पाच वर्षांच्या कालावधीसाठी व्याज दर 9.1% आहे. बँकेने हे दर 5 जुलै 2023 पासून लागू केले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 9.60% आहे.

- 5 वर्षांच्या कालावधीसाठी 9.10% व्याज दर (सामान्य ग्राहक)

- 5 वर्षांच्या कार्यकाळावर 9.60% व्याजदर (ज्येष्ठ नागरिकांसाठी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळ्याप्रकरणी 24 जण अटकेत!

SCROLL FOR NEXT