सेटलमेंट आणि भूमी अभिलेखमध्‍ये 345 पदांची भरती, महसूल खात्‍याकडून आदेश जारी

Goa Land Records 345 posts recruitment: सेटलमेंट आणि भूमी अभिलेख खात्‍यात पुढील पाच वर्षांत ३४५ पदांची भरती करण्‍यात येणार आहे.
Goa Land Records 345 posts recruitment
Goa Land Records 345 posts recruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सेटलमेंट आणि भूमी अभिलेख खात्‍यात पुढील पाच वर्षांत ३४५ पदांची भरती करण्‍यात येणार आहे. महसूल खात्‍याचे अवर सचिव आग्‍नेल डिसोझा यांनी याबाबतचा आदेश जारी करीत ही माहिती दिली आहे.

खात्‍यात पुढील पाच वर्षांत संचालक, साहाय्‍यक संचालक तसेच उपसंचालकाची (प्रशासक) प्रत्‍येकी एक, सर्व्हे आणि भूमी अभिलेख अधीक्षकांच्‍या दोन, साहाय्‍यक सर्व्हे सेटलमेंट अधिकाऱ्याची एक, सर्व्हे आणि भूमी अभिलेख निरीक्षकांच्‍या १५, अकाउंटंटची एक, पर्यवेक्षकांच्‍या ९, प्रमुख सर्वेक्षकांच्‍या ३३ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

Goa Land Records 345 posts recruitment
Goa Temple Theft: वेेरेत मंदिराची काैले काढून चोरांनी फंडपेटी केली लंपास, चौघा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

तसंच ड्राफ्ट्समन ग्रेड एकच्‍या तीन, फिल्‍ड पर्यवेक्षकांच्‍या १५७, ड्राफ्ट्समन ग्रेड दोनच्‍या २५, मशीन ऑपरेटरची एक, हेड क्‍लार्कच्‍या तीन, अप्‍पर डिव्‍हिजन लिपिकाच्‍या १२, कनिष्‍ठ स्‍टेनोग्राफरची एक, अप्‍पर डिव्‍हिजन लिपिक दोनच्‍या ३६, चालकांच्‍या तीन तसेच शिपाई आणि स्‍टाफ होल्‍डरच्‍या प्रत्‍येकी २० जागांवर भरती करण्‍यात येणार असल्‍याचे आदेशात म्‍हटले आहे. नुकत्‍याच झालेल्‍या राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत याबाबतच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता मिळाल्‍याचेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com