Union Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2023: मोदी सरकार तरुणांवर मेहरबान, अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा

Union Budget 2023: भारत हा तरुणांचा देश असून देशाचे भविष्यही तरुणांवर अवलंबून आहे. तरुणांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल.

Manish Jadhav

Union Budget 2023: भारत हा तरुणांचा देश असून देशाचे भविष्यही तरुणांवर अवलंबून आहे. तरुणांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. हे लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये अनेक योजना जाहीर केल्या आहेत. आधुनिक शिक्षण लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन अर्थमंत्री म्हणाल्या की, मोदी सरकारचा विश्वास आहे की, 'कोणत्याही देशाच्या विकासात तरुणांचा मोठा वाटा असतो. आज देशातील युवक विकासात आणि प्रगतीमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. या मोहिमेत सरकारनेही (Government) तरुणांची पूर्ण काळजी घेणे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता पडू न देणे हे आपले कर्तव्य मानले आहे.'

जाणून घ्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या?

पुढील आर्थिक वर्षात 47 लाख तरुणांना नवीन अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यासोबतच सुमारे 30 लाख तरुणांना उच्च शिक्षणासाठी (Education) शिष्यवृत्ती दिली जाईल, जेणेकरुन चांगले शिक्षण घेऊन देशाच्या विकासात आपले अनमोल योगदान देऊ शकतील.

यासोबतच सरकार 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स उघडणार आहे. तरुणांसाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरु करण्यात येणार आहे. यासोबतच केंद्र सरकार तरुणांना एआय आणि ड्रोनचे प्रशिक्षणही देणार आहे, जेणेकरुन भारतीय तरुणांना आधुनिकता आणि तंत्रज्ञानाशी जोडून इतर देशांतील तरुणांच्या खांद्याला खांदा लावून चालता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT