Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प एकादशीला होतोय सादर, जाणून घ्या त्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्व

Budget 2023: 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर होणार असून, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Budget 2023
Budget 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ११ वाजता संसदेत देशाचे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल , या अर्थसंकल्पाबाबत प्रत्येकजण उत्सुक आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाचा दिवस खूप खास असल्याचे बोलले जात आहे. कारण अर्थसंकल्पाच्या (Budget) दिवशी माघ शुक्लची जया एकादशी आहे आणि याशिवाय अनेक शुभ योगही या दिवशी बनत आहेत.

  • यंदाचा अर्थसंकल्प एकादशीला होणार सादर

हिंदू धर्मात एकादशी तिथी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात. एकादशीचा संबंध भगवान विष्णूशी आहे. माघ शुक्ल पक्षातील जया एकादशीला अर्थसंकल्पक सादर केला जात आहे. भगवान विष्णूची पूजा केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते.

Budget 2023
Union Budget 2023: काही तासातच अर्थसंकल्प सादर होणार; वाचा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक
  • 2023 च्या अर्थसंकल्पावर हा महायोग तयार होत आहे

ज्योतिषशास्त्रानुसार अर्थसंकल्पाच्या (Budget) दिवशी म्हणजेच माघ शुक्ल एकादशीला सर्वार्थ सिद्धी महायोग तयार होत आहे. शास्त्रामध्ये हा योग अत्यंत शुभ मानला गेला आहे. या योगात केलेले कार्य शुभ फल देते. मात्र 1 फेब्रुवारीला भद्राची सावलीही काही काळ राहणार आहे. शास्त्रात भाद्राला अशुभ मानले गेले आहे.

भद्रकाल सकाळी 07:10 पासून सुरू होईल, जो दुपारी 02:01 पर्यंत चालेल. त्याच वेळी, सर्वार्थ सिद्धी योग देखील सकाळी 07:10 पासून सुरू होईल, जो दुसऱ्या दिवशी पहाटे 03:23 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 1 फेब्रुवारी रोजी सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव दिवसभर राहील.

  • अर्थसंकल्प 2023 बुधवारच्या शुभ दिवशी

आठवड्यातील तिसरा दिवस म्हणजे बुधवार, ज्याचे विशेष महत्त्व आहे. कारण बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. कोणतेही शुभ, नवीन किंवा महत्त्वाचे कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण आणि पूजा करणे महत्त्वाचे आहे. त्याला विघ्नहर्ता म्हणतात, म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या दूर करणारा. त्यामुळे बुधवारी केलेल्या कामात कोणताही अडथळा येत नाही, असे मानले जाते. अशा परिस्थितीत, बुधवारी भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 सादर करणे हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुभ दिवस मानला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com