Union bank of India cuts home loan rates  Dainik Gomantak
अर्थविश्व

घर घेणाऱ्यांसाठी दिवाळी गोड, ही बँक देतीय सर्वात स्वस्त कर्ज

बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर 6.40 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत

दैनिक गोमन्तक

सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank Of India) या दिवाळीत घर खरेदीदारांना बंपर ऑफर दिली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजदरात कपात करत . बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर 6.40 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. यापूर्वी हा दर 6.80 टक्के होता. 27 ऑक्टोबरपासून हर नवीन दर लागू होतील.बँकेने सांगितले की, "या ऑफरचा आमच्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात फायदा होईल कारण घर खरेदीची वाढती मागणी दिसत आहे." या कमी व्याजदरासह, युनियन बँक ऑफ इंडियाचा गृहकर्ज दर हा उद्योगातील सर्वात कमी दार मानला जात आहे.(Union bank of India cuts home loan rates)

युनियन बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या गृहकर्जावरील व्याज दर आता 6.40 टक्क्यांपासून सुरू होईल. बँकेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात कमी गृहकर्ज दर आहे. बँकेने म्हटले आहे की नवीन कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांव्यतिरिक्त, त्यांचे विद्यमान कर्ज हस्तांतरित करणाऱ्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाने आणलेला गृहकर्जासाठीचा 6.40 टक्के हा व्याजदर सर्व बँकांमध्ये सर्वात कमी आहे. आतापर्यंत बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाने सणासुदीच्या काळात 6.50 टक्के व्याजदरासह गृहकर्जाच्या ऑफर दिल्या आहेत.मात्र युनियन बँक ऑफ इंडिया ही सर्वात कमी दर आकारात आहे.

सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने आणि ग्राहकांना घरखरेदी अधिक परवडणारी व्हावी यासाठी बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. देशातील मोठ्या बँकांपैकी स्टेट बँक (SBI), ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, HSBC, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, येस बँक या गृहकर्जावर आकर्षक ऑफर देत आहेत. या सर्व बँका गृहकर्जाच्या व्याजदरात भरीव सूट देत आहेत.

यावर्षी प्रथमच , SBI ने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन जाहीर केले आहे, जे 6.70 टक्के दराने दिले जात आहे. कर्जाची रक्कम विचारात न घेता, व्याज दर 6.70 टक्के निश्चित केला जातो. यापूर्वी 75 लाखांपेक्षा जास्त गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना 7.15 टक्के व्याज द्यावे लागत होते. आता हेच व्याज 6.70 टक्के झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

पहिल्यांदाच गाजवणार 'तेलगू' सिनेसृष्टी! अक्षय खन्ना साकारणार अजेय शुक्राचार्य; अंगावर शहारे आणणारा लूक Viral

ॲशेसवर कांगारुंची मोहोर! WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची बादशाहत कायम; इंग्लंडच्या पराभवाचा टीम इंडियाला फायदा की तोटा?

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT