EPFO Alert: PF ग्राहकांसाठी UAN नंबर आवश्यक

वयाच्या 55 ​​वर्षांनंतर तुम्ही निवृत्तीनंतर पैसे काढू शकता. याशिवाय, निवृत्तीपूर्वीही अनेक कारणांसाठी तुमच्या EPF खात्यातून पैसे काढू शकता.
EPFO Office
EPFO Office Dainik Gomantak
Published on
Updated on

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी करते. तुम्ही UAN वापरून तुमचे EPF खाते ट्रॅक करू शकता.

UAN ऑनलाईन कसे मिळवायचे:

जर नोकरी करत असाल आणि EPFO ​​चे सदस्य असाल तर UAN नंबर तुमच्यासाठी महत्वाचा आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी करते. UAN वापरून, तुमचे EPF खाते ट्रॅक करू शकता, तुमचे पासबुक ऑनलाइन पाहू शकता. एकापेक्षा जास्त पीएफ खाते असल्यास, तुम्ही UAN वापरून तुमच्या सर्व पीएफ खात्यांचे तपशील एकाच ठिकाणी पाहू शकता. तुमचा UAN नंबर घरबसल्या ऑनलाईन जाणून घेऊ शकता.

UAN स्टेटस कसे तपासायचे?

  • सर्व प्रथम EPFO ​​च्या वेबसाइटवर जा.

  • त्यानंतर Our Services या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर, सदस्य UAN/ ऑनलाइन सेवा (OCS/ OTCP) वर जा.

  • आता Know Your UAN Status वर क्लिक करा.

    UAN नंबर कसा मिळवायचा:

  • यासाठी सर्वप्रथम सदस्य आयडी किंवा आधार क्रमांक किंवा पॅन टाका.

  • त्यानंतर, तपशील जसे की नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. प्रविष्ट करा.

  • त्यानंतर कॅप्चा टाका आणि Get Authorization Pin वर क्लिक करा.

  • या चरणांचे अनुसरण केल्यानंतर, तुम्हाला तुमचा UAN क्रमांक एसएमएसद्वारे पाठविला जाईल.

EPFO Office
Bank Holidays: दिवाळीच्या सुट्टीसह नोव्हेंबर महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद..

वयाच्या 55 ​​वर्षांनंतर तुम्ही निवृत्तीनंतर पैसे काढू शकता. याशिवाय, निवृत्तीपूर्वीही अनेक कारणांसाठी तुमच्या EPF खात्यातून पैसे काढू शकता. घर खरेदी किंवा बांधकाम, मुलाचे लग्न आणि शिक्षण आणि कोरोना व्हायरसच्या काळात कोणत्याही आर्थिक आणीबाणीसाठी पैसे काढू शकता. घरी बसून PF काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

याशिवाय, तुमच्या स्मार्टफोनवर PF खात्याचे तपशील देखील पाहू शकता. हे उमंग अॅपवर तपासले जाऊ शकते. हे अॅप भारत सरकारचे आहे. ते अँड्रॉइडवरील गुगल प्ले स्टोअर आणि Iphone वरील अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. या अॅपद्वारे, EPF सदस्यांना पासबुक पाहणे, PF साठी दावा करणे इत्यादी विविध सुविधा मिळू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com