Aadhaar Card New Rule Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

UIDAI New SOP For Aadhaar Name Update: युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नावामध्ये सुधारणा किंवा बदल करण्यासाठी एक नियमावली जारी केली.

Manish Jadhav

UIDAI New SOP For Aadhaar Name Update: युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नावामध्ये सुधारणा किंवा बदल करण्यासाठी एक नियमावली जारी केली. आता ही नवीन व्यवस्था लागू झाली असून, नाव बदलाच्या प्रक्रियेला चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले, जेणेकरुन लोकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागणार नाही आणि काम वेळेत पूर्ण होईल.

पहिल्या श्रेणीमध्ये लहान-सहान चुकांचा समावेश होतो. यामध्ये नावाचे स्पेलिंग, इनिशिअल्स पूर्ण किंवा छोटे करणे, मधले किंवा आडनाव जोडणे किंवा काढणे, शब्दांचा क्रम बदलणे किंवा नावामधील डॉट काढणे यांसारख्या गोष्टी येतात. या प्रकारच्या बदलांसाठी आधार सेवा केंद्रावर फक्त एक वैध ओळखपत्र द्यावे लागते.

दुसऱ्या श्रेणीनुसार, विवाह (Marriage) किंवा घटस्फोटानंतर नाव किंवा सरनेम बदलायचे असल्यास ओळखपत्रासोबत 'ॲनेक्झर डी' हे सादर करणे बंधनकारक आहे. याद्वारे हे स्पष्ट होते की, हा बदल केवळ वैवाहिक स्थितीमुळे झाला आहे आणि मूळ ओळख तीच आहे. जेंडर चेंज किंवा नवजात बालकांच्या नावामध्ये बदल करण्यासाठीही यात विशेष तरतुदी आहेत.

तिसऱ्या श्रेणीमध्ये डेटा-एंट्रीची चूक येते. अर्ज भरताना कागदपत्रे बरोबर देऊनही केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे नावात स्पेलिंग मिस्टेक झाल्यास, वयानुसार ॲनेक्झर बी किंवा ॲनेक्झर सी यांसारखे हलफनामा आणि ओळखपत्र देऊन ही चूक सुधारता येते. चौथ्या आणि अंतिम श्रेणीनुसार, जर एखादी व्यक्ती आपली मूळ ओळख बदलून संपूर्ण नावच बदलत असेल, तर अशा 'मेजर नेम चेंज'साठी सरकारी राजपत्र आणि वैध ओळखपत्र जमा करणे अनिवार्य करण्यात आले.

नावामध्ये बदल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावे लागते. तिथे बदलाच्या वर्गवारीनुसार योग्य तो फॉर्म आणि कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करुन डेमोग्राफिक अपडेटसाठी ठरवून 75 रुपयांचे शुल्क भरावे लागते. पावतीवर दिलेल्या युआरएन क्रमांकाद्वारे अर्जाचे स्टेटस ऑनलाईन ट्रॅक करता येते. केंद्रावर जाण्यापूर्वी आपल्या बदलाची वर्गवारी नीट समजून घेतल्यास आणि योग्य कागदपत्रे तयार ठेवल्यास अर्ज फेटाळण्याची शक्यता पूर्णपणे संपते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT