DEADLINE ALERT! फक्त 31 डिसेंबरपर्यंत वेळ! लगेच करा 'हे' काम, नाहीतर तुमचं 'PAN Card' होईल बंद

Aadhaar PAN Card link Deadline : आधार–पॅन लिंकिंगची अंतिम तारीख आता जवळ आली असून ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
Aadhaar PAN Card link  2025 Deadline
Aadhaar PAN Card link 2025 DeadlineDainik Gomantak
Published on
Updated on

Aadhaar PAN Card link

आधार–पॅन लिंकिंगची अंतिम तारीख आता जवळ आली असून ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची मुदत निश्चित करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून त्या व्यक्तीचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) कर-संबंधित पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आधार–पॅन लिंक अनिवार्य केले आहे. विशेषत: १ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी पॅन कार्ड जारी करण्यात आलेल्या नागरिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत लिंकिंग पूर्ण करणे आवश्यक आहे.

तसेच, ज्यांनी आधार नोंदणी आयडी वापरून पॅन मिळवले आहे, त्यांनीही ही प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे. ही सुविधा आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध आहे.

Aadhaar PAN Card link  2025 Deadline
Goa Revenue: गोवा सरकारच्या तिजोरीत 5410 कोटी! केंद्राकडून आकडेवारी जारी; पेट्रोलियम पदार्थ, गॅस करातून प्राप्ती

पॅन निष्क्रिय झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अंतिम मुदतीपर्यंत लिंक न केल्यास आयकर रिटर्न (ITR) भरता किंवा पडताळता येणार नाही, तसंच रिफंडही जारी केला जाणार नाही. प्रलंबित ITR प्रक्रिया थांबवली जाईल.

फॉर्म 26AS मध्ये TDS/TCS क्रेडिट दिसणार नाही. काही प्रकरणांमध्ये TDS/TCS जास्त दराने वसूल करण्याची शक्यता असते. आर्थिक व्यवहार, पगाराचा क्रेडिट, तसेच SIP व्यवहारांमध्येही समस्या निर्माण होऊ शकते. लिंकिंगनंतर साधारणपणे ३० दिवसांत पॅन पुन्हा सक्रिय केला जातो.

सरकारने या प्रक्रियेसाठी नागरिकांना इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले आहे. पॅन–आधार लिंकिंग घरबसल्या ऑनलाइन करता येते. यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते.

'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करून पॅन, आधार आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण केली जाते. जर पॅन आधीच निष्क्रिय असेल, तर लिंकिंगपूर्वी ₹1,000 शुल्क भरावे लागते.

Aadhaar PAN Card link  2025 Deadline
Goa ZP Election: भाजपची अनपेक्षित खेळी! विरोधकांचा विस्‍कटला प्‍लॅन, अचानक उमेदवार बदलल्याने गोंधळ, लाटंबार्सेत राजकीय उलथापालथ

लिंक केल्यानंतर नागरिकांनी ‘Quick Links → Link Aadhaar Status’ या पर्यायावर जाऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. अंतिम तारीख जवळ आल्याने करदात्यांनी विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com