Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Train मध्ये 'एअर इंडिया कांड', टीटीईने महिलेवर केली लघवी; रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ...

Rail Minister Ashwini Vaishnaw: लखनौमध्ये अमृतसरहून कोलकात्याला जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये उपस्थित असलेल्या टीटीईने एका महिला प्रवाशाच्या डोक्यावर लघवी केली.

Manish Jadhav

TT urinates on the Female Passenger: विमानानंतर ट्रेनमध्येही प्रवाशावर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

लखनऊमध्ये अमृतसरहून कोलकात्याला जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये उपस्थित असलेल्या टीटीईने एका महिला प्रवाशाच्या डोक्यावर लघवी केली.

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कारवाई केली आहे. त्यांच्या आदेशावरुन टीटीईला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.

संपूर्ण प्रकरण

ही घटना सोमवार (13 मार्च) ची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश आपल्या पत्नीसोबत रेल्वेच्या ए-1 कोचमधून प्रवास करत होते.

टीटीई मुन्ना कुमारने लघवी केली तेव्हा त्यांची पत्नी तिच्या सीटवर झोपली होती. ही घटना रात्रीची आहे. महिलेच्या (Woman) आवाजाने जमलेल्या प्रवाशांनी टीटीईला पकडले.

दरम्यान, टीटीई नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. जीआरपी सीओ संजीन नाथ सिन्हा यांनी सांगितले की, आरपीएफ कंट्रोल रुम आणि ट्विटरद्वारे माहिती मिळाली की, एक जोडपे बिहारमधून येत होते. मात्र, चारबाग रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी मुन्ना कुमारने महिलेवर लघवी केली, त्यानंतर जीआरपी पोलिस चारबाग स्टेशनवर पोहोचले.

रेल्वे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, 13 मार्च रोजी फिर्यादी आपल्या पत्नीसह किउल ते अमृतसरला ट्रेन क्रमांक 12317 कोच क्रमांक A-1 सीट क्रमांक 31 आणि 31 मध्ये जात होते.

रात्री 12.30 वाजता मुन्ना कुमार सीट क्रमांक 41 जवळ आला आणि त्याने फिर्यादीच्या पत्नीवर लघवी केली.

फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरुन मुन्ना कुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, त्याला अटक करुन पोलीस (Police) ठाण्यात पाठवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी फ्लाइटमध्ये घडली होती, जेव्हा एका मद्यधुंद व्यक्तीने शेजारी बसलेल्या महिलेवर लघवी केली होती.

त्यानंतर अमेरिकेत काम करणाऱ्या आरोपी शंकर मिश्रा याला ताब्यात घेऊन 4 महिन्यांसाठी एअर इंडियाच्या विमानात उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली होती.

नुकत्याच झालेल्या दुसर्‍या घटनेत, न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशावर लघवी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT