Digital India Dainik Gomantak
अर्थविश्व

ऑनलाईन बँकिंग वापरताय? मग 'हॅकर्स' पासून सावधान..!

ऑनलाईन बँकिंगचा (Online Banking) वापर करताना यात आपले अकाऊंट हॅक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जाणून घ्या सावधानतेच्या गोष्टी.

दैनिक गोमन्तक

Digital India: ‘डिजिटल इंडिया’ (Digital India) अंतर्गत मागील काही वर्षांपासून ऑनलाईन बँकिंग (Online Banking) व्यवहारांना चालना मिळाली आहे. यामुळे फायदा असा झाला की, आपला वेळही वाचला आणि आपल्या बँकेसंदर्भातील अनेक समस्याही संपल्या. असे जरी असले तरी प्रत्येक तंत्रज्ञानाचा जसा फायदा होतो तसाच त्याचा तोटाही होतो.

सायबर फसवणुकीपासून वाचा

ऑनलाईन व्यवहार करताना सगळ्यात जास्त शक्यता असते ती म्हणजे सायबर फसवणुकीची (Cyber ​​Crime) म्हणजे हॅकिंगची. याचसाठी केंद्र स्तरावरून आणि प्रत्येक राज्य स्तरावरून यासंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कारण तरुणाई असेल किंवा कॉर्पोरेट विश्वातील व्यक्ति असतील, वेळेच्या कमतरतेमुळे आणि फास्ट जीवनशैलीमुळे मोबाईल बँकिंगचा (Mobile Banking) वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

अनेक सायबर हॅकर्स सतत इंटरनेटवर ॲकटीव्ह असून डिजिटल जगात चाललेल्या आर्थिक व्यवहारांवर त्यांचे बारीक लक्ष असते. अशा हॅकर्सच्या अनेक टोळ्या या कामासाठी 24 तास सक्रिय असतात. आर्थिक व्यवहार करताना तुमची थोडी जरी चूक झाली, तर हे हॅकर्स लगेच तुमच्या अकाऊंट वर तुमच्या नकळत हल्ला करतात. हे प्रकार टाळण्यासाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ (PIB Fact Check) ने काही टिप्स आणि सूचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन करून आपण या हॅकर्सपासून आपले बँक अकाऊंट सुरक्षित ठेऊ शकता.

पीआयबी फॅक्ट चेकने फसवणुकीपासून वाचण्यासाठी दिलेल्या सूचना :

  • बँकेसंदर्भात व्यवहार करताना आलेले ओटीपी (One-Time Password) किंवा पिन (PIN) कुणालाही देऊ नका.

  • मोबाईल बँकिंग किंवा पैसे पाठवण्यासाठी/ घेण्यासाठी वापरत असलेल्या ॲप्सचे पासवर्ड कुणालाही सांगू नका. अगदी जवळच्या व्यक्तीलाही नाही.

  • कोणतेही पासवर्ड मोबाईलमध्ये लिहून ठेऊ नका.

  • बँकिंग व्यवहारांसाठी कठीण पासवर्ड ठेवा.

  • एटीएम (ATM) पिन कुणालाही देऊ नका किंवा कुठेही लिहून ठेऊ नका.

  • सार्वजनिक वाय-फाय (Public Wi-Fi) वापरत असाल तर त्यावेळी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.

  • ब्राऊजर वरून व्यवहार करत असल्यास, नंतर ब्राऊजर हिस्टरी डिलिट (Delete Browser History) करून टाका.

  • तुमच्या बँकेच्या येणाऱ्या प्रत्येक मेसेजकडे गांभीर्याने लक्ष द्या.

  • कोणत्याही प्रकारचा बदल जाणवल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.

वरील सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर नक्कीच आपण ऑनलाईन होणाऱ्या सायबर क्राईम (Cyber ​​Crime) पासून आपली सुटका करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT