‘गोमन्तक’च्या ‘यंग इन्स्पीरेटर्स नेटवर्क’च्या उपक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

विविध महाविद्यालयातील पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घेतला होता भाग..
Young Inspirers Network
Young Inspirers Network Dainik gomantak
Published on
Updated on

पणजी : ‘सकाळ’ माध्यम समूह तसेच दै. ‘गोमन्तक’च्या ‘यंग इन्स्पीरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) गोव्यातील या पहिल्याच कार्यक्रमाला स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने येणाऱ्या काळात ‘यिन’तर्फे असे असंख्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने घेण्यात आलेली ‘ हास्य स्पर्धा’ ही केवळ स्पर्धा बनून न राहता आपले आयुष्यही खळखळून आनंदात जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन दै. ‘गोमन्तक’चे संपादक - संचालक राजू नायक यांनी केले.

Young Inspirers Network
प्रियंका गांधी उद्या गोव्यात !

राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी (Students) आयोजित केलेल्या ‘गोव्याचे हास्यसम्राट’ या स्पर्धेनंतर ते बोलत होते. पणजीतील (Panaji) इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तंत्रशिक्षण विभागाचे संचालक विवेक कामत, ज्येष्ठ लेखक दिलीप बोरकर, प्रा. डॉ. राजय पवार, शशिकांत पुनाजी, हास्य सम्राट मनोहर भिंगी उपस्थित होते.

संपादक - संचालक राजू नायक यांनी ‘यिन बद्दल’, दै. ‘गोमन्तक’च्या (gomantak) बदललेल्या स्वरूपाबद्दल तसेच लवकरच सुरु करण्यात येणाऱ्या ‘गोमन्तक’ टी. व्ही. वाहिनीविषयी माहिती दिली.

दरम्यान, विविध महाविद्यालयातील पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. दि. 24 व दि. 25 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी फोंड्यातील गोवा (Goa) विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात आणि म्हापशातील ज्ञान प्रसारक मंडळाच्या सभागृहात घेण्यात आली होती. त्यातील निवडक दहा स्पर्धकांची अंतिम फेरी काल (बुधवारी) घेण्यात आली. सारिका शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Young Inspirers Network
'ममता बॅनर्जी या हिंदू ब्राह्मणच',भाजपच्या हिंदूविरोधी टिकेला TMC चे उत्तर

स्पर्धेचा निकाल...

अंतिम फेरीत मुलांनी आपल्या खास शैलीत सादर केलेल्या कलेने सभागृहातील प्रत्येकाची मने जिंकली. या विद्यार्थ्यांमधील कला अकादमी थिएटर आर्टसचा वैभव कवळेकर (प्रथम), फर्मागुढी पी. ई. एस. एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी रोहिदास भिंगी (द्वितीय), तर गोवा विद्यापीठाची विद्यार्थिनी कान्वी मायणीकर (तृतीय) यांनी पारितोषिके पटकावली.

हास्यसम्राट मनोहर भिंगी, विद्यार्थ्यांचे कौतुक

स्पर्धेला सुरवात झाल्यानंतर मध्यांतरच्या काळात हास्यसम्राट मनोहर भिंगी यांनी राजकीय नेत्यांची हुबेहूब नक्कल करून उपस्थितांकडून टाळ्याच्या कडाटात वाहवा मिळवली. राजकीय नकला, आजूबाजूला घडणाऱ्या गमती -जमती, बसमधील प्रवासात घडणाऱ्या मजा, उखाणे, वडील-मुलांच्या गप्पा अशा विविध विषयांच्या माध्यमातून स्पर्धक विद्यार्थ्यांनी सभागृहात एकच धमाल उडवून दिली. कोणी काव्यात्मक पद्धतीने तर कोणी शायरीतून आपली गमतीदार ओळख करून दिली. काही स्पर्धकांनी आपल्या विशेष वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोरोनाच्या काळात आलेला कंटाळा या स्पर्धकांच्या हास्य मैफिलीने कायमचा दूर झाल्याची भावना प्रेक्षकांनी सभागृहातून बाहेर पडताना व्यक्त केली.

‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ हा विषय अभ्यासपूर्वक सादरीकरणाचा आहे. यात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वाचन. असंख्य भाषांमधील साहित्य, ललितलेखन आणि विनोदी लेखन वाचल्याने कलाकार आपली कला अधिक नेटकेपणाने सादर करू शकतो. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलांनी जर विशेष मेहनत केली तर ते आपल्या कलेने लोकांची मनं जिंकू शकतात. एक उत्तम हास्यकलाकार म्हणून ते काम करू शकतात. हास्यकला हा प्रांत फक्त मुलांपुरता मर्यादित नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com