31 डिसेंबरपूर्वी ही महत्वाची आर्थिक कामे करावी पूर्ण

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

31 डिसेंबरपूर्वीच पूर्ण करा ही आर्थिक कामे अन्यथा...

2021 वर्षात अशी काही कामे आहेत जी पूर्ण करणे आवश्यकआहे कारण अन्यथा नवीन वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावेल लागेल.

दैनिक गोमन्तक

डिसेंबर महिना संपण्यासाठी केवळ 9 दिवस उरले आहेत. यानंतर नवीन वर्षांचे (New Year) आगमन होणार आहे. यामुळे या वर्षात अशी काही कामे आहेत जी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावेल लागेल. तुमचे सर्व आर्थिक कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि ती कामे कोणती आहेत हे आज जाणून घेणार आहोत.

* सरकारी सेवानिवृत्तीसाठी त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र म्हणजेच जीवन सन्मान प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 आहे. सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 च्या आधीच्या मुदतीवरून 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यामुळे पेन्शनधारकांनी निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्रे वेळेवर सादर करणे महत्वाचे आहे.

* सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (Bank Of India ) 30 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या KYCप्रक्रियेची अंतिम मुदत वाढवली आहे. डीमॅट खातेधारकाने अपडेट (Update) करणे आवश्यक असलेले केवायसी डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत- नाव, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्न मर्यादा

* तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असला तर आणि EPFO सदस्य असाल तर EPF खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत EPFO ने आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत, सर्व सदस्यांचे UAN देखील आधार सत्यापित करणे अनिवार्य आहे. त्यामुके तुम्ही तुमचे EPF खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे आणि तुमचा UAN आधारशी पडताळणे आवश्यक आहे.

* तुम्ही जर बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुम्हाला या महिन्यापर्यंत कार्यरत व्याजावर गृहकर्ज मिळेल. बँक ऑफ बडोदाने सणासुदीच्या हंगामात गृहकर्जाचा व्याजदर 6.50 % पर्यंत कमी केला आहे. यामुळे तुम्ही स्वस्त दरात गृहकर्ज (Home Lone) घेऊ शकता. या ऑफरचा लाभ 31 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे. यामुळे तुम्ही जर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करून या ऑफरचा लाभ घेवउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT