Rule Change From 1st September Dainik Gomantak
अर्थविश्व

Rule Change From 1st September: उद्यापासून देशभरात बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

1st September 2023: गॅस सिलिंडरच्या किमतीपासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंतचे नियम आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत.

Manish Jadhav

Rule Change From 1st September: उद्यापासून नवा महिना सुरु होत आहे. 1 सप्टेंबर 2023 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

गॅस सिलिंडरच्या किमतीपासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंतचे नियम आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे 1 तारखेपूर्वी कोणते नियम बदलणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत...

1. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल

दरम्यान, नोकरदारांच्या आयुष्यात 1 सप्टेंबरपासून मोठा बदल होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नियम 1 पासून बदलणार आहेत. या नवीन नियमांनुसार टेक होम सॅलरी वाढणार आहे.

याचा फायदा अशा कर्मचाऱ्यांना (Employees) होईल, ज्यांना राहण्यासाठी घर मिळाले आहे आणि त्यांच्या पगारातून काही कपात केली जाते. उद्यापासून रेंट-फ्री अकोमोडेशन संबंधी नियम बदलणार आहेत.

2. अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड

1 सप्टेंबरपासून अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) प्रसिद्ध मॅग्नस क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार आहे. या बदलांनंतर, ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी रिवॉर्ड पॉइंट मिळतील.

यासोबतच पुढील महिन्यापासून ग्राहकांना काही व्यवहारांवर विशेष सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच ग्राहकांना 1 तारखेपासून वार्षिक शुल्कही भरावे लागणार आहे.

3. एलपीजी ते सीएनजीचे नवीन दर जारी केले जातील

यासोबतच, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल करतात. यावेळी सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

4. बँका 16 दिवस बंद राहतील

याशिवाय, पुढील महिन्यात बँकांमध्ये 16 दिवसांची सुट्टी असणार आहे, त्यामुळे यादी पाहूनच नियोजन करावे. RBI कडून दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार असतात, त्यामुळे त्यानुसार बँकेच्या शाखेला भेट देण्याची योजना करा.

5. IPO लिस्टिंगचे दिवस कमी होतील

आयपीओ सूचीबाबत सेबीने मोठे पाऊल उचलले आहे. SEBI 1 सप्टेंबरपासून IPO लिस्टिंगचे दिवस कमी करणार आहे. शेअर बाजारात शेअर्सची लिस्टिंग करण्याची मुदत अर्ध्या म्हणजे तीन दिवसांवर आणण्यात आली आहे.

SEBI च्या म्हणण्यानुसार, IPO बंद झाल्यानंतर सिक्युरिटीजच्या सूचीसाठी लागणारा वेळ 6 कामकाजाच्या दिवसांवरुन (T+6 दिवस) तीन कामकाजाच्या दिवसांवर (T+3 दिवस) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे 'T' ही अंकाची शेवटची तारीख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT