Changes From 1 April: सरकारची मोठी घोषणा, 1 एप्रिलपासून बदलणार हे नियम; आत्ताच जाणून घ्या नाहीतर...

Changes From 1 April: आर्थिक वर्ष 2022-23 संपणार आहे. यासोबतच नवीन आर्थिक वर्षापासून आणि एप्रिल महिन्यापासूनच अनेक नवे नियमही लागू होतील.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

Changes From 1 April: आर्थिक वर्ष 2022-23 संपणार आहे. यासोबतच नवीन आर्थिक वर्षापासून आणि एप्रिल महिन्यापासूनच अनेक नवे नियमही लागू होतील. या नियमांचा सर्वसामान्यांवरही परिणाम होणार आहे.

अशा परिस्थितीत 1 एप्रिल 2023 पासून होणार्‍या नवीन बदलांबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे बदल आर्थिक व्यवहार, सोन्याचे दागिने इत्यादींशीही संबंधित आहेत. 1 एप्रिल 2023 पासून कोणते नियम बदलणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पॅन कार्ड-आधार कार्ड लिंकिंग

31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. यानंतर 1 एप्रिल 2023 पासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

पॅन कार्ड (PAN Card) निष्क्रिय केल्यामुळे लोकांना आयकर भरण्यात अडचण येऊ शकते आणि अधिक करही जमा होऊ शकतो. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे लोकांना आर्थिक व्यवहार करण्यात आणि आयकर भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Money
Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, केंद्र सरकार करु शकते पेन्शन योजनेत मोठा बदल

सोन्याच्या दागिन्यांची विक्री

केंद्रीय ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, 1 एप्रिलपासून हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) शिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही.

ग्राहकांचे (Customer) हित लक्षात घेऊन सरकारने असा निर्णय घेतला आहे की, 31 मार्च 2023 नंतर HUID हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीस परवानगी दिली जाणार नाही.

Money
Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आली मोठी अपडेट

इंधनाच्या किमती

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे नवीन दर सरकारी तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. मार्च महिन्यातच एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. अशा परिस्थितीत यंदाही 1 एप्रिल रोजी इंधनाच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com