Rules Change From June 1, 2023: 1 जूनपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या

Rules Change From June 1, 2023: येत्या काही दिवसांत मे महिना संपेल आणि जून महिना सुरु होईल. कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक बदल होत आहेत.
Money
MoneyDainik Gomantak

Rules Change From June 1, 2023: येत्या काही दिवसांत मे महिना संपेल आणि जून महिना सुरु होईल. कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून अनेक बदल होत आहेत. त्यामुळेच यंदाही 1 जूनपासून असे अनेक बदल होणार आहेत.

या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया जूनमध्ये कोणते बदल होणार आहेत, ज्यामुळे सर्वसमान्य व्यक्ती प्रभावित होईल.

इलेक्ट्रिक दुचाकी महागणार!

जर तुम्ही जूनमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही तोटा सहन करावा लागू शकतो.

याचे कारण असे की, सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर (Rules Change From June 1, 2023) अनुदानाची रक्कम 10,000 रुपये प्रति kWh पर्यंत कमी केली आहे, तर पूर्वी ही रक्कम प्रति kWh रुपये 15,000 होती.

शासनाचा हा आदेश 1 जून 2023 पासून लागू होणार आहे. याचा सरळ अर्थ असा की, 1 जूननंतर सबसिडी (Subsidy) कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करणे 25-30 हजार रुपयांनी महाग होऊ शकते.

Money
Rules Change: GST च्या नियमांपासून ते एटीएम व्यवहारापर्यंत, 1 मेपासून बदलणार 'हे' नियम!

गॅस सिलेंडरच्या किमतीचे काय होणार?

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो (Rules Change From June 1, 2023). गॅस कंपन्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती.

मात्र, मार्चपासून 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मार्च 2023 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता ही किंमत कायम राहते की, कमी होते हे पाहावे लागेल.

Money
Rules Change From 1st October 2022: 1 तारखेपासून बदलणार अनेक नियम, जाणून घ्या

CNG-PNG किमती

दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून किंवा आठवड्यापासून पीएनजी-सीएनजीच्या किमतीतही बदल होतो. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली (Delhi) आणि मुंबईत त्यांच्या किंमती सुधारतात.

यावेळी त्यांची किंमत बदलू शकते. एप्रिलमध्ये दिल्ली-एनसीआर (CNG PNG Price in Delhi) मध्ये त्यांची किंमत कमी झाली होती, तर मेमध्ये ती स्थिर होती. मात्र, जूनमध्ये सीएनजी-पीएनजीचे दर काय असतील, हे येत्या काही दिवसांत कळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com