Home Loan Latest News Dainik Gomantak
अर्थविश्व

Home Loan: RBI च्या व्याजदरवाढीनंतर महागलेल्या गृह कर्जापासून वाचवतील 'हे' 4 उपाय

महिन्याचे आर्थिक बजेट बिघडू नये यासाठी करता येईल परफेक्ट नियोजन

Akshay Nirmale

Home Loan: आरबीआयने बुधवारी रेपो दरात 0.35 टक्के वाढ केल्यानंतर सर्वच कर्जेही महागली आहेत. त्यामुळे कर्जाचा हफ्ताही वाढणार आहे. या वाढत्या हफ्त्याने जर तुमचे आर्थिक गणित बिघडणार असेल तर आम्ही तुमच्यासाठी चार पर्याय घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्हाला महागड्या कर्जामुळे आर्थिक नियोजन बिघडण्यापासून वाचता येईल.

(RBI Monetary Policy)

जर तुमचे गृह कर्ज 20 लाखाचे असेल, त्याचा कालावधी 20 वर्षे असेल आणि व्याज दर 7.55 % असेल तर तुमचा हप्ता 16,173 रुपये असेल. पण नव्या व्याजदरवाढीनतंर 7.55 % व्याजर 7.90 टक्क्यांवर जाईल. त्यामुळे कर्जाचा हप्ता 16,605 रुपए होईल.

कर्जाचा हफ्ता वाढल्याने महिन्याचे बजेट बिघडू नये, म्हणून हे उपाय वापरता येतील.

1. रिफायनान्स

जेव्हा तुमच्या कर्जाचा व्याजदर आणि बाजारातील व्याजदर यात मोठे अंतर (0.25-0.50%) असते तेव्हा होम लोन रिफायनान्स म्हणजेच बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय वापरला जातो. जर तुमच्या कर्जाचा व्याजदर 7.90% आहे आणि मार्केटमधील व्याजदर 7.50 % असेल तर अशात बॅलन्स ट्रान्सफर लाभदायी ठरू शकते. पण कर्जफेडीचा अर्ध्याहून अधिक कालावधी बाकी असेल तेव्हाच हा पर्याय जास्त फायदेशीर ठरू शकतो. कारण ट्रान्सफरचे खर्चही असतात. त्यात प्रोसेसिंग फी आणि एमओडी चार्जेस असतात.

2. EMI वाढवा

तुमचे उत्पन्न वाढले तरी तुमचा EMI तेवढाच राहील. पण तुम्ही EMI वाढवू शकता. अतिरिक्त EMI दिल्याने कर्जाची मुद्दल कमी होईल. आणि कर्ज लवकर फिटेल आणि कर्जाचा कालावधीही कमी होईल. हा पर्याय एकप्रकारे लहान प्री-पेमेंट सारखा आहे. उदाहरणार्थ जर 7.90 टक्के व्याजावर 20 वर्षांसाठी 30 लाख कर्ज असेल तर EMI जवळपास 24,907 रुपए असेल. दुसऱ्यावर्षी जर तुम्ही EMI 32 हजार रुपए केलात तर तुमचे तीन हप्ते कमी होतील.

3. प्री-पेमेंट करा

व्याजदर वाढल्यास तुम्हाला EMI वाढवायचा नसेल तर तिसरा पर्याच आहे तो म्हणजे वर्षात किमान एकदा प्री पेमेंट करा. त्यातून कर्जाची मुद्दल घटेल. त्यामुळे बँक किंवा वित्तसंस्थांना वाटेल की तुम्ही EMI च्या किमान 1 ते 2 पट रक्कम प्री-पेमेंट करावी. उदाहरणार्थ जर 7.55 टक्के व्याजदरावर 20 वर्षांसाठी 30 लाख रुपए होम लोन असेल तर सुरवातीलाच एक लाख रूपये प्री-पेमेंट केल्यास तुमचे 4 EMI कमी होतील. त्यामुळे एकुण व्याजही कमी होईल. शिवाय लोन लवकर फिटेल.

4. कर्जाचा कालावधी वाढवा

अनेकदा गृह कर्जाच्या EMI मुळे मासिक खर्चावर परिणाम होत असतो. अशा जास्त सेव्हिंग होत नसेल तर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवू शकता. त्यातून EMI कमी करता येऊ शकतो. पण यात एक नुकसान आहे, यात तुम्हाला जास्त व्याज मोजावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT