RBI Monetary Policy: वर्षभरात पाचव्यांदा महागली गृह, वाहन कर्जे; आरबीआयकडून व्याज दरात वाढ

रेपो रेट 6.25 टक्क्यांवर, जीडीपी वाढीचा दर 6.8 राहण्याचा अंदाज
RBI Monetary Policy
RBI Monetary PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

RBI Monetary Policy: महागाईचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याज दर पुन्हा वाढवले आहेत. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 35 बेसिस पॉईंट वाढ केली. त्यामुळे आता व्याजदर 5.40 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे. दरम्यान, आरबीआयने केलेली ही या वर्षातील पाचवी व्याजदरवाढ आहे. त्यामुळे गृह, वाहन, वैयक्तिक कर्ज देखील पाचव्यांदा महागले आहे.

RBI Monetary Policy
PM Kisan: मोठा झटका! 1.86 कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 6000 रुपये; सरकारने पकडली चोरी

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आरबीआय मॉनेटरी पॉलिसी कमिटीतील 6 पैकी 5 सदस्य रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या बाजूचे होते.

यापुर्वी 30 सप्टेंबर रोजी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट, त्याआधी ऑगस्ट आणि जूनमध्येही प्रत्येकी 50 बेसिस पॉईंट आणि मे महिन्यात 40 बेसिस प्वॉईंट वाढ केली होती. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाई आपल्या अंदाजापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. महागाई दर पुढील चार महिन्यात चार टक्क्यांहून अधिक असेल.

जीडीपी वाढीचा दर 6.8 टक्के राहणार

RBI ने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये जीडीपी वाढीचा दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुर्वी हा अंदाज 7 टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहित हा दर 4.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर जानेवारी ते मार्च या कालावधीत हा दर 4.2 टक्के राहू शकतो.

RBI Monetary Policy
Sukanya Samriddhi Yojana: PPF-सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच...

व्याजदरात आणखी वाढ होणार

ऑक्टोबरमधील महागाई नियंत्रणात राहिली होती. त्याबाबतची आकडेवारी उत्साहवर्धक होती. जर महागाई नियंत्रणात राहिली तर आरबीआय व्याजदरातील वाढ रोखू शकते. जर असे झाले नाही तर फेब्रुवारीत पुन्हा एकदा आरबीआयकडून रेपो रेटमध्ये अखेरची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर दीर्घकाळासाठी व्याजदरात वाढ केली जाणार नाही. तज्ज्ञांच्या मते, यावेळी झालेली व्याजदरवाढ अखेरची नसेल. आरबीआयला सध्या आर्थिक विकास दराची चिंता नाही, तर महागाईची चिंती आहे, त्यामुळे आरबीआय व्याज दर वाढविण्यापासून मागे हटणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com