The RBI has imposed the fine to ICICI bank & PNB 

 
Dainik Gomantak
अर्थविश्व

देशातील या दोन बड्या बँकांवर RBI चा कारवाईचा बडगा

दैनिक गोमन्तक

रिझर्व्ह बँकेने देशातील दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. बुधवारी माहिती देताना आरबीआयने सांगितले की त्यांनी पंजाब नॅशनल बँकेला (PNB) एक कोटी रुपयांहून अधिक आणि आयसीआयसीआय बँकेला (ICICI Bank) लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचे कारण स्पष्ट करताना आरबीआयने सांगितले की, दोन्ही बँकांमध्ये नियामक अनुपालनातील त्रुटी आढळून आल्या, त्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे.(The RBI has imposed the fine to ICICI bank & PNB )

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या म्हणण्यानुसार, नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी पंजाब नॅशनल बँकेला (PNB) 1.8 कोटी रुपये आणि ICICI बँकेला 30 लाख रुपयांचा दंड RBI कडून ठोठावण्यात आला आहे.

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी वैधानिक तपासणी (ISE) 31 मार्च 2019 रोजी तिच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आयोजित केली होती.ISE आणि इतर दस्तऐवजांची छाननी केल्यानंतर, RBI ला PNB द्वारे शेअर्सचे तारण संबंधित त्याच्या तरतुदींचे उल्लंघन आढळले आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

तर, ICICIबँकेच्या कारवाई बद्दल खुलासा करताना RBI ने म्हटले आहे की बँकेच्या पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी वैधानिक तपासणी 31 मार्च 2019 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात केली गेली. नंतर आरबीआयला असे आढळून आले की बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्यासाठी शुल्क आकारण्यासंबंधीच्या सूचनांचे पालन ICICIबँकेकडून केले गेले नाही.त्यामुळे बँकेला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI ने सांगितले की दोन्ही प्रकरणांमध्ये दंड नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित होता आणि बँकांनी त्यांच्या संबंधित ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता वाढवण्याचा हेतू नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT