The Indian smart television market grew by 8 percent in the first half of 2023 with shipments of 4.5 million units. Dainik Gomantak
अर्थविश्व

Smart TV Market: किमती अन् फीचर्स ठरताहेत गेम चेंजर, भारतातील स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये विक्रमी वाढ

Smart TV India Market: मोठ्या आकाराच्या स्क्रीनच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, 55 इंची आकाराच्या टीव्हीला बहुतेक लोकांची पसंती आहे. 30 ते 33 हजार रुपये किमतीच्या टीव्हीला अजूनही अधिक मागणी आहे.

Ashutosh Masgaunde

The Indian smart television market grew by 8 percent in the first half of 2023 with shipments of 4.5 million units: भारतीय स्मार्ट टेलिव्हिजन मार्केट 2023 च्या पहिल्या सहामाहीत (1H23) 4.5 दशलक्ष युनिट्सच्या शिपमेंटसह 8 टक्क्यांनी वाढले आहे, असे एका नवीन अहवालात म्हटले आहे.

गेल्या काही काळात स्मार्ट टीव्हीच्या किमती, त्यातील फिचर्स, ऑनलाइन खेरेदीतील ऑफर्स याचा ग्राहकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय स्मार्ट टीव्ही मार्केट वाढण्यास मोठी मदत झाल्याचे समोर आले आहे.

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) नुसार, ऑनलाइन चॅनेलचा हिस्सा पहिल्या सहामाहीत 25 टक्क्यांनी वाढला, ऑनलाइन विक्री सेलमुळे तो 39 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

2022 मध्ये, 7 टक्के वाढीसह 9.8 दशलक्ष स्मार्ट टीव्ही युनिट्स भारतात पाठवण्यात आले होते. किंमती कमी झाल्यामुळे, ग्राहक स्ट्रीमिंग स्टिकसह परवडणारा स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचा पर्याय निवडत आहेत. अशी माहिती IDC इंडियाच्या रिसर्च मॅनेजर उपासना जोशी यांनी दिली.

स्मार्ट टीव्ही विक्रीची कारणे

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2023 च्या पहिल्या सहामाहीत 8 टक्के वाढ होण्यास काही कारणे जबाबदार आहेत.

यामध्ये विविध कंपन्यांनी लॉन्च केलेल्या जुन्या इन्व्हेंटरी आणि टीव्हीचे मॉडेल क्लिअर करणे याचा समावेश आहे. इतकेच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षक किमतीत टीव्ही मिळण्यासारखी अनेक कारणे जबाबदार आहेत.

ऑनलाइन ई-कॉमर्स मार्केटने स्मार्ट टीव्हीच्या विक्रीला चालना देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आज बाजारात ३९ टक्के स्मार्ट टीव्ही ऑनलाइन विकले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या 25 टक्के वाढ झाली आहे.

'या' आकाराच्या टीव्ही ला सर्वाधिक मागणी

मार्केटचा पहिल्या सहामाहीचा कल दर्शवितो की सर्वाधिक ग्राहकांनी 32 इंच आणि 43 इंच टीव्ही विकत घेण्याला पसंती दर्शवली आहे.

दुसरीकडे, जर आपण मोठ्या आकाराच्या स्क्रीनच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, 55 इंची आकाराच्या टीव्हीला बहुतेक लोकांची पसंती आहे. 30 ते 33 हजार रुपये किमतीच्या टीव्हीला अजूनही अधिक मागणी आहे. यामध्ये सर्वाधिक 35 टक्के वाढ झाली आहे.

सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, लोक आता त्यांचे जुने टीव्ही बिघडले तर दुरुस्त करण्याचा विचार करत नाहीत. कारण आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या टीव्हीच्या किमती कमी असल्याने नवीन टीव्ही खरेदीकडे त्यांचा कल आहे.

कमी किंमतीमुळे मार्केटला बूस्ट

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अहवालात असे दिसून आले आहे की, स्मार्ट टीव्हीच्या किमतीत झालेली घट हे देखील विक्री वाढण्याचे प्रमुख कारण आहे. पहिल्या सहामाहीत, टीव्हीच्या किमती 3 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

सर्व ब्रँड बाजारात सरासरी किमतीचे टीव्ही आणत आहेत. बाजारात 15 ते 20 हजार किंमतीचे टीव्ही सामान्यतः पाहिले जातात. या श्रेणीतील टीव्हीचा हिस्सा 26 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

ज्या टीव्हीमध्ये आधीच अॅप्स अपलोड केलेले आहेत त्यांना बाजारात जास्त मागणी आहे. ८ जीबी स्टोरेज असलेल्या टीव्हीच्या विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT