Elon Musk  Dainik Gomantak
अर्थविश्व

Elon Musk Networth: मस्क 400 बिलियन डॉलर पार; आख्या जगात ठरले सर्वात श्रीमंत, इतिहासातील पहिलेच व्यक्ती

Elon Musk net worth $400 billion: वैयक्तिकरित्या एवढी संपत्ती असणारे मस्क जगाच्या इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

Pramod Yadav

Elon Musk Networth

अमेरिका: स्पेस एक्स, टेस्ला आणि एक्स यासारख्या कंपनीचे मालक एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांची संपत्ती ४०० बिलियन डॉलर एवढी झाली असून, एवढी संपत्ती असणारे मस्क जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

बूलमबर्गच्या रिपोर्टनुसार, टेस्ला कंपनीच्या शेअर्सच्या झालेल्या विक्रीतून मस्क यांच्या संपत्तीत वृद्धी झाल्याचे समोर आले आहे. या शेअर्समुळे मस्क यांच्या संपत्तीत ५० बिलियन डॉलर एवढी वाढ झाली असून, त्यांची एकूण संपत्ती ४३९.२ बिलियन डॉलर एवढी झालीय. वैयक्तिकरित्या एवढी संपत्ती असणारे मस्क जगाच्या इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

२०२२ मध्ये मस्क यांच्या संपत्तीत घट झाली होती. मस्क यांच्या संपत्तीत जवळपास २०० बिलियन डॉलर घट झाली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांना फायदा झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. मस्क यांनी या निवडणुकीत एक प्रमुख डोनर म्हणून उदयास आले.

निवडणुकीदरम्यान आणि नंतर टेस्ला आणि स्पेस एक्सच्या शेअर्समध्ये मिळून ६५ टक्के वाढ झाली आहे. टेस्ला बाजारी भांडवल १.३१५ ट्रिलियन डॉलर वाढले आहे. टेस्लाची भांडवल वाढ देखील इतिहासातील सर्वात मोठी असल्याचे तज्ञ सांगतात. तसेच, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील नवे स्टार्टअप देखील मस्क यांच्या संपत्तीत भर घालत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मस्क यांच्या संपत्तीत वाढ होण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गणित देखील जोडले जाते. मस्क ट्रम्प यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी सक्रियपणे कॅम्पेन देखील केले होते. ट्रम्प यांच्यासाठी कॅम्पेन आणि नंतर मिळालेला विजय मस्क यांच्या उद्योगासाठी देखील फायदेशीर ठरल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT