Cryptocurrency  Dainik Gomantak
अर्थविश्व

नवीन आर्थिक वर्षात क्रिप्टो गुंतवणूकदारांना बसणार कराचा फटका

नवीन आर्थिक वर्षात औषधे महागणार

दैनिक गोमन्तक

मार्च महिना संपत आला असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. अशा परिस्थितीत महिन्याची सुरुवात मोठ्या बदलांसह होणार आहे. यामध्ये एकीकडे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कराचा फटका बसणार आहे, तर दुसरीकडे औषधांच्या किमती वाढणार आहेत.

क्रिप्टोमधून कमाईवर कर
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) कर लावण्यात येणार आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व आभासी डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टो मालमत्तांवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत, जर गुंतवणूकदाराला क्रिप्टो मालमत्ता विकून फायदा झाला तर त्याला सरकारला कर भरावा लागेल. यासह, जेव्हा जेव्हा क्रिप्टो मालमत्ता विकली जाते तेव्हा त्याच्या विक्रीच्या एक टक्के दराने TDS कापला जाईल.

औषधांच्या किमती वाढणार
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांसाठी औषधांवर (Medicines) होणारा खर्च वाढणार आहे. महागाईमुळे हैराण झालेल्यांसाठी 1 एप्रिलपासून औषधे घेणे महाग होणार आहे. अहवालानुसार, 800 जीवनावश्यक औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल या तापासाठी मूलभूत औषधाचा समावेश आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने या औषधांच्या घाऊक किंमत निर्देशांकात बदल करण्यास मान्यता दिली आहे.

गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता
दर महिन्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या दिवशीही गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. एप्रिलमध्ये पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडेच एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT