Air India Dainik Gomantak
अर्थविश्व

एअर इंडिया पुन्हा टाटा सन्सकडेच!

टाटा सन्सने राष्ट्रीय वाहक एअर इंडिया घेण्याची बोली जिंकली आहे. एअर इंडियाच्या खाजगीकरणासाठी (Air India Privatization) स्थापन झालेल्या मंत्र्यांची समितीची पार पडली.

दैनिक गोमन्तक

टाटा सन्सने (Tata Sons) एअर इंडियाची (Air India) बोली जिंकली. आता एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी टाटा सन्सची बनली आहे. एअर इंडियाला टाटा सन्सकडे येण्यासाठी तब्बल 68 वर्षे लागली. 1953 साली भारत सरकारने (Government of India) टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी खरेदी केली. अशा स्थितीत एअर इंडियाला टाटा समूहाकडे परत येण्यास एकूण 68 वर्षे लागली. एअर इंडियाची सुरवातीपासूनची रोचक कथा जाणून घेऊया.

1932 मध्ये स्थापित केली गेली

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली, ज्याचे नंतर टाटा एअरलाइन्स असे नामकरण करण्यात आले. भारतातील प्रसिध्द उद्योजक जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरु केली होती. एप्रिल 1932 मध्ये, टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल नेण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल उड्डाण केले, पुढे ते एअरक्राप्ट मद्रासपर्यंत गेले. ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट नेव्हिल विंटसेंट होते. जे टाटांचे जवळचे मित्रही होते. सुरुवातीला, कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा सुरु केली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद- मुंबई मार्गे चालविण्यात आली. पुढच्या वर्षात, एयरलाइन्सने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला होता.

टाटा एअरलाईन्सचे नाव बदलले

एअरलाईनने सहा आसनी माईल मर्लिनसह मुंबई- त्रिवेंद्रम दरम्यान पहिले देशांतर्गत सेवा सुरु केली. 1938 मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स करण्यात आले. 1938 मध्ये, कोलंबो आणि दिल्ली त्याच्या गंतव्यस्थानांमध्ये जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी, निर्वासितांची सुटका करण्यासाठी तसेच विमानांची देखभाल करण्यासाठी मदत केली.

सरकारने 1953 मध्ये मालकी घेतली

1953 मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास करत टाटा सन्स कडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. तथापि, जेआरडी टाटा 1977 पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. नंतर मात्र कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले.

1962 मध्ये एअर इंडियाचे नाव बदलण्यात आले

21 फेब्रुवारी 1960 रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. विमान कंपनीने 14 मे 1960 रोजी न्यूयॉर्कला सेवा सुरु केली. 8 जून 1962 रोजी एअरलाइनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे करण्यात आले. आणि विशेष म्हणजे 11 जून 1962 रोजी एअर इंडिया जगातील पहिली जेट विमान कंपनीही बनली.

2000 मध्ये, एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरु केली. 23 मे 2001 रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक Michael Mascarenhas यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर मात्र 2007 मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स एअर इंडिया लिमिटेड मध्ये विलीन करण्यात आली.

2017 मध्ये खाजगीकरणासाठी सरकारची मान्यता

यानंतर, 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडियाच्या खाजगीकरणाला मंजुरी दिली. वर्ष 2018 मध्ये एअर इंडियाला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अयशस्वी ठरला. त्या अपयशी प्रयत्नांनंतर, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली. एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आमंत्रित केलेल्या एअर इंडियाच्या 100 टक्के भागांसह सरकारी मालकीच्या विमान कंपनीत त्याचा 100 टक्के हिस्सा आहे. मध्ये 50 टक्के इक्विटी विकण्यासाठी निविदा काढण्यात आली होती.

एअर इंडियावर एकूण 38,366.39 कोटी रुपयांचे कर्ज आहे. ही रक्कम एअर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेडच्या विशेष उद्देश वाहनात (एसपीव्ही) 22,064 कोटी रुपये हस्तांतरित केल्यानंतर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT