Air Indiaची मालकी पुन्हा TATA कंपनीकडे?

राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडिया (Air India) खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून बोली मिळाल्याचे सरकारने सांगितले आहे
Tata Sons bids to buy Air India
Tata Sons bids to buy Air IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडिया (Air India) खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून बोली मिळाल्याचे सरकारने सांगितले आहे (Air India Privatization). बोली लावलेल्या कंपन्यांमध्ये टाटा सन्सचा (TATA Sons) देखील समावेश असल्याचे समजत आहे. याबाबतची अधिकृत माहिती खुद्द टाटा सन्सच्या प्रवक्त्याने दिली आहे. (Tata Sons bids to buy Air India)

डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी या प्रकरणावर ट्विट करत , "एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आर्थिक बोली व्यवहार सल्लागाराने प्राप्त केली आहे. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे."अशी माहिती दिली आहे.

सरकार सरकारी मालकीच्या राष्ट्रीय विमान कंपनीमध्ये आपला 100 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे, ज्यात एअर इंडिया लिमिटेडचा एअर इंडिया लिमिटेडचा 100 टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा 50 टक्के हिस्सा आहे.जानेवारी 2020 मध्ये सुरू झालेल्या भागविक्री प्रक्रियेला COVID -19 साथीमुळे विलंब झाला. एप्रिल 2021 मध्ये सरकारने संभाव्य बोलीदारांना आर्थिक बोली लावण्यास सांगितले होते सरकार एअर इंडियामधील आपला संपूर्ण 100% हिस्सा विकत आहे. एअर इंडिया 2007 पासून देशांतर्गत ऑपरेटर इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून तोट्यात आहे.

Tata Sons bids to buy Air India
Modi Govt: केंद्र सरकारकडून टेलिकॉम कंपन्यांसाठी मोठी घोषणा

TATA कंपनीकडे AIR INDIA परतणार

अनेक कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये टाटा समूहाचे नाव आघाडीवर आहे. एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समूहानेच केली होती. टाटा समूहाचे जे. आर.डी टाटा यांनी याची सुरुवात केली होती, ते स्वतः एक अतिशय कुशल पायलट देखील होते. आता टाटा समूहाने त्याच्या खरेदीसाठी आर्थिक निविदा सादर केल्यामुळे, एअर इंडिया टाटा समूहाकडे परत येते का हे पाहणे बाकी आहे.

AIR INDIA सरकारी कंपनी?

दुसऱ्या महायुद्धानंतर, भारतात सामान्य हवाई सेवा सुरू झाली आणि नंतर ती एअर इंडिया असे नाव देऊन सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली. वर्ष 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमानसेवेची गरज जाणवली आणि भारत सरकारने एअर इंडियामध्ये 49% हिस्सा विकत घेतला. यानंतर, 1953 मध्ये, भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा समूहाकडून कंपनीतील बहुसंख्य भाग खरेदी केला. अशा प्रकारे एअर इंडिया पूर्णपणे सरकारी कंपनी बनली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com