Tata Punch SUV Flex Fuel model Social Media X
अर्थविश्व

Tata Punch Flex Fuel: 100 टक्के इथेनॉलवर धावणारी टाटाची 'पंच' येतेय; किंमत, फिचर्स जाणून घ्या

Tata Punch Flex Fuel Car: येत्या काळात पंचचे पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक मॉडेल्ससारखे फ्लेक्स फ्युएल मॉडेलही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Pramod Yadav

Tata Punch Flex Fuel

Tata Motors: पर्यावरण पूरक इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीवर भर देत आहे. पर्यायी इंधनांमध्ये आजकाल इथेनॉलची खूप चर्चा होत आहे आणि जगातील अनेक देशांतील लोक त्याचा वापर करत आहेत.

नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक उत्पादने देखील केली, त्यापैकी 'पंच फ्लेक्स फ्युएल' ही कार अतिशय खास होती. या कारमध्ये फक्त 1.2 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये बदल केले जाणार आहेत.

Tata Punch SUV Flex Fuel model

देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV Tata Punch येत्या काही दिवसांत फ्लेक्स फ्युएल अवतारात दिसू शकते. महत्वाची बाब म्हणजे ती 100 टक्के इथेनॉलवर चालू शकते. येत्या काळात पंचचे पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक मॉडेल्ससारखे फ्लेक्स फ्युएल मॉडेलही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

नव्या मॉडेलमुळे लोकांच्या खिशावरचा भार आणखी कमी होणार आहे, कारण इथेनॉलची किंमत पारंपरिक इंधन आणि गॅसच्या तुलनेत कमी असेल.

पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून जगभरात विविध प्रकारच्या पर्यायी इंधनांची चर्चा सुरु आहे. यात इथेनॉलवर चालणाऱ्या विविध गाड्या बाजारात येऊ पाहत आहेत.

भारतात, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर सारख्या कंपन्यांनी देखील त्यांच्या फ्लेक्स फ्युएल कार प्रदर्शनात मांडल्या होत्या. आता टाटा मोटर्स देखील पंच फ्लेक्स इंधनाद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, पंचचे फ्लेक्स फ्युएल मॉडेल कधी लाँच होईल याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, ते लवकरच विक्रीसाठी उपसब्ध होईल, अशी चर्चा आहे.

Tata Punch Flex Fuel

Tata Punch Price

टाटा पंचच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली भारतातील एक प्रसिद्ध कार आहे. पंच कारच्या पेट्रोल आणि सीएनजी वेरिएंटच्या किमती 6 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 10.32 लाख रुपयांपर्यंत जातात.

तर, टाटा पंच EV च्या एक्स-शोरूम किंमती 9.99 लाख ते 14.29 लाख रुपयांपर्यंत आहेत. टाटा पंचचे फेसलिफ्ट मॉडेल या वर्षी येत्या काही महिन्यांत लॉन्च केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT