Institute of Ayurveda Goa: मृतदेह पाहिजे! धारगळ आयुर्वेद महाविद्यालयात शैक्षणिक प्रात्यक्षिक खोळंबले

All India Institute of Ayurveda Goa: येत्या काही महिन्यांत तालुका पातळीवर मोफत चिकित्सा शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यावेळी देहदानासाठी आवाहन केले जाणार आहे.
cadaver shortages affect medical education
Dead Bodies Shortage In Goa Medical CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: धारगळ येथील आयुर्वेद महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम सुरू होऊन दोन वर्षे होत आली तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आता सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी मृतदेह कमी पडत आहेत. त्यामुळे देहदानाची मोहीम राबवण्याचा विचार व्यवस्थापनाच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

येत्या काही महिन्यांत तालुका पातळीवर मोफत चिकित्सा शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यावेळी देहदानासाठी आवाहन केले जाणार आहे. अनेकांना देहदान करायचे असते, मात्र त्यासाठीची प्रक्रिया ठाऊक नसते. आजवर तीन जणांचे मृतदेह देहदान योजनेतून महाविद्यालयाला मिळाले आहेत.

एका तुकडीसाठी एका मृतदेहाची गरज असते. शरीरशास्त्र विषय शिकवतात, विविध अवयवांची कार्ये मृतदेहाच्या आधारे शिकवली जातात. त्यामुळे मृतदेह मिळावेत यासाठी महाविद्यालयातून विशेष प्रयत्न येत्या काही दिवसांत केले जाणार आहेत.

cadaver shortages affect medical education
GMC Goa: 'गोमेकॉ'त १६० सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण! तुकडीनुसार 'पुन्हा' आयोजन

पदव्युत्तर पदवीसाठी २० जागा, १० गोव्यासाठी

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद नावाने ही संस्था ओळखली जाते. या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून चार शाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या संस्थेत आता पदव्युत्तर पदवीसाठी २० जागा उपलब्ध आहेत, ज्यापैकी ५० टक्के म्हणजेच १० जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत या जागा भरल्या जात आहेत. संचालनालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच फेरीत गोव्यासाठी राखीव असलेल्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. या संस्थेत १०० पदवीपूर्व जागांपैकी ५० टक्के जागा देखील गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

पदव्युत्तर पदवीच्या २० जागा ही फक्त सुरवात आहे. संस्थेचा मास्टर्स अभ्यासक्रम पुढे अधिक वाढवण्याचा मानस आहे. या जागांसाठी परवानगी नोव्हेंबरच्या मध्यात मिळाली होती. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही सरकारी संस्था असल्याने, येथील शुल्क खासगी संस्थांपेक्षा खूपच कमी आहे आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे जागा लगेच भरल्या गेल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

cadaver shortages affect medical education
GMC : गोमेकॉत 'आयव्हीएफ'ने 13 जणींना अपत्यप्राप्तीचे सुख, गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा

जागृती करणार

अनेकांना देहदान करायचे असते, मात्र त्यासाठीची प्रक्रिया ठाऊक नसते. मोफत चिकित्सा शिबिरांवेळी याबाबत जागृती करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com