Tata  Dainik Gomantak
अर्थविश्व

टाटाने मोडला रेकॉर्ड, Hyundai ला मागे टाकत मारली बाजी

भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) मे 2022 मध्ये विक्रीचे रेकॉर्ड मोडले.

दैनिक गोमन्तक

भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने मे 2022 मध्ये विक्रीचे रेकॉर्ड मोडले. तीन पट वाढ करुन 43,341 वाहनांची विक्री केली आहे. अशा प्रकारे दक्षिण कोरियाच्या ह्युंदाईला मागे टाकत टाटाने मे महिन्यात पुन्हा एकदा कार विक्रीत दुसरे स्थान पटकावले. मे महिन्यात भारतात 42,293 वाहनांची विक्री करुन Hyundai तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी डिसेंबरमध्ये, टाटाने Hyundai ला मागे टाकले होते, जेव्हा त्यांनी Hyundai च्या 32,312 वाहन विक्रीच्या तुलनेत 50 टक्के वाढ नोंदवून 35,299 प्रवासी वाहने विकली होती.(Tata has once again overtaken Hyundai to become the second-largest carmaker in May)

मे 2022 च्या टॉप 3 ऑटो कंपन्या

मारुती सुझुकी इंडिया अजूनही पहिल्या स्थानावर आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने मे 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात 128,000 वाहनांची विक्री केली. दुसरीकडे, टाटा (Tata) मोटर्स 43,341 वाहनांची विक्री करुन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेली Hyundai मे 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत (Market) केवळ 42,293 वाहने विकू शकली.

मारुतीने धमाका केला

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) साठी आर्थिक वर्ष 2021-22 हे उत्तम विक्री वर्ष ठरले आहे. या कालावधीत कंपनीने विक्रमी 238,376 कार निर्यात केल्या आहेत. कोणत्याही आर्थिक वर्षातील हा उच्चांक आहे. मार्च 2022 मध्ये कंपनीने 26,496 कार निर्यात केल्या. जी कंपनीसाठी आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यातील सर्वात मोठी निर्यात आहे. हे भारत सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमाप्रती मारुती सुझुकीची वचनबद्धता देखील दर्शवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT