Tata Group Chairman N. Chandrasekaran Dainik Gomantak
अर्थविश्व

Tata Group: आनंदाची बातमी! येत्या पाच वर्षांत 5 लाख नोकऱ्या देणार टाटा समूह; 'या' क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी

Tata Group Chairman N. Chandrasekaran: टाटा समूहाने रोजगारासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचे समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी सांगितले.

Manish Jadhav

टाटा समूहाने रोजगारासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचे समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी इंडियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटच्या एका परिसंवादात बोलताना ही माहिती दिली. चंद्रशेखरन यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित उद्योग अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील.

विकसित भारतासाठी...!

चंद्रशेखरन यांनी या घोषणेदरम्यान उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यावर भर दिला आणि भारताच्या विकसित होण्याच्या ध्येयामध्ये हे क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, "जर आपण उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या वाढवू शकलो नाही, तर हे शक्य आहे की आपण विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करु शकणार नाही."

काय म्हणाले चंद्रशेखरन?

टाटा समूहाने विविध क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीच्या आधारे या नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. चंद्रशेखरन म्हणाले, "सेमीकंडक्टर, प्रेसिजन मॅन्युफॅक्चरिंग, असेम्ब्ली, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित आमच्या अनेक गुंतवणुकीच्या आधारे, मला वाटते की आम्ही पुढील 5 वर्षांत अर्धा दशलक्ष उत्पादन रोजगार निर्माण करु." टाटा समूह आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लांट आणि इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित अनेक युनिट्सची स्थापना करत आहे. चंद्रशेखरन यांच्या मते, "या नोकऱ्यांचा खूप सकारात्मक परिणाम होईल."

10 कोटी रोजगार निर्माण करावे लागतील

चंद्रशेखरन यांनी यासाठी सरकारी मदतीची गरज असल्याचेही नमूद केले. त्यांच्या मते, "वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारताला अंदाजे 10 कोटी रोजगार निर्माण करावे लागतील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT