EcoSoul Home|Rahul Singh  Dainik Gomantak
अर्थविश्व

Success Story: 3 वर्षे अन् 300 कोटींची कंपनी! भारतीय तरुणाची अमेरिका, जर्मनी, कॅनडा आणि यूके मध्ये करोडोंची कमाई

राहुल अमेरिकेतील बोस्टन येथील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी वेफेअरमध्ये काम करत होता, तिथेच त्याची अरविंदशी भेट झाली. त्यानंतर दोघांनी मिळून 2020 मध्ये वॉशिंग्टनमध्ये EcoSoul Home नावाची कंपनी सुरू केली.

Ashutosh Masgaunde

Success Story of founder of EcoSoul Home Rahul Singh:

जगासमोर आज प्लास्टिक ही आज मोठी समस्या म्हणून उभी ठाकली आहे. अलीकडे आलेल्या अनेक अहवालानुसार प्लास्टिक कचऱ्याच्या गैरव्यवस्थापनात भारत जगातील देशांमध्ये 12 व्या क्रमांकावर आहे. हे 12 देश जगातील 52% प्लास्टिकचे गैरव्यवस्थापन करतात.

प्लास्टिक कचऱ्याच्या या गैरव्यवस्थापनामुळे प्लास्टिक कचरा एकतर लँडफिलमध्ये जातो आणि जमीन प्रदूषित करतो किंवा कचऱ्याचे मोठे डोंगर तयार करोत.

पण आजच्या काळात देशातील अनेक तरुण असे स्टार्टअप सुरू करत आहेत, जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करुन जगासमोरील ही मोठ्या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावत आहे.

प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करत त्याच्या पुनर्वापरातून छत्तीसगडच्या राहुल सिंगने इकोसोल होम नावाची कंपनी सुरू केली.

ही कंपनी झाडांची पाने आणि बांबू यांसारख्या साहित्यापासून पर्यावरणपूरक उत्पादने बनवत आहे. ज्यामुळे प्लास्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होत आहे.

कोण आहे राहुल सिंग?

राहुल सिंगचा जन्म छत्तीसगडमधील भिलाई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. राहुलने त्याच्या गावातच सरकारी शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2005 मध्ये सुरतमधून बीटेक मध्ये पदवी मिळवली. आणि जमशेदपूरच्या झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केल्यानंतर राहुल 2008 मध्ये अमेरिकेला गेला. तेथे राहुलने 2008 ते 2019 या काळात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत उद्योगाचे अनेक धडे गिरवले. त्याचसोबत आपली अर्थिक स्थिती भक्कम केली.

...आणि सुरू केली स्वतःची कंपनी

लहानपणापासून राहुल पर्यावरणाचा आणि विशेषतः प्लास्टिकच्या वाढत्या वापराचा विचार करत होता. यामुळे त्याने स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये ते पर्यावरणपूरक उत्पादने बनवू शकेल.

यात त्याला अरविंद गणेशन यांनी साथ दिली.राहुल अमेरिकेतील बोस्टन येथील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी वेफेअरमध्ये काम करत होता, तिथेच त्याची अरविंदशी भेट झाली. त्यानंतर दोघांनी मिळून 2020 मध्ये वॉशिंग्टनमध्ये EcoSoul Home नावाची कंपनी सुरू केली.

3 वर्षे आणि 300 कोटींचा व्यवसाय

पुढे राहुलने आपली कंपनी मे 2021 मध्ये भारतात लॉन्च केली. भारतात हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला, त्यानंतर 2022 मध्ये राहुल आपल्या कुटुंबासह भारतात परतला.

आज त्यांचा व्यवसाय भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, जर्मनी इत्यादी अनेक देशांमध्ये पसरलेला आहे आणि त्यांचे 150 हून अधिक उत्पादन युनिट सर्वत्र कार्यरत आहेत.

आज अवघ्या 3 वर्षात कंपनीची उलाढाल 280 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भिलाईत जन्मलेल्या राहुलने आपल्या कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत 1.3 दशलक्ष टन प्लास्टिकची बचत केली असून पर्यावरण वाचवण्यासोबतच तो आपला व्यवसायही वाढवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Today's Live Updates Goa: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दीपराज गावकर करणार गोव्याचं नेतृत्व!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT