21 years mumbai boy build generic aadhaar medicine Worth 500 crores:
भारतातील मेडिकल स्टोअर्समध्ये औषधे किती महागडी आहेत हे सर्वांनाच ठावूक आहे. ही महागडी औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे औषधाअभावी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
या सर्व बाबी लक्षात येताच 16 वर्षांच्या अर्जुन देशपांडेने ही समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. आणि सुरू केले जेनेरिक आधार नावाचा एक स्टार्टअप.
अर्जुन देशपांडेने जेनेरिक आधार नावाच्या स्टार्टअपद्वारे 90% पर्यंत सवलतीत औषधे विकण्यास सुरुवात केली. जेनेरिक आधार स्टोअरमधून बाजारापेक्षा 80-90% कमी किमतीत औषधे मिळत असल्याने देशभरातून याला प्रतिसाद मिळू लागला.
अर्जुनची ही कल्पना खूपच अनोखी होती, याने रतन टाटा यांच्यासारखे दिग्गज पी खूप प्रभावित झाले आणि त्यांनी या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली.
अर्जुन देशपांडे 16 वर्षांचा असताना त्याने औषधे इतकी महाग का आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाचे उत्तर शोधत अर्जुनने एप्रिल 2019 मध्ये जेनेरिक आधार सुरू केले. पहिले स्टोअर उघडणे हे अवघड काम होते पण अर्जुनने हे काम अतिशय चोखपणे पार पाडले.
अर्जुन देशपांडेला अशी कंपनी बनवायची होती ज्यामध्ये कमी किमतीत औषधे तयार होतील. जेणेकरून महागडी औषधे विकत घेऊ न शकणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होऊ शकेल. त्यांनी जेनेरिक औषधांची कल्पना रतन टाटा यांना सांगितली. त्यांला ही कल्पना खूप आवडली.
यानंतर रतन टाटा यांच्या मदतीने अर्जुन देशपांडेने 'जेनेरिक आधार' नावाची कंपनी सुरू केली. फार्मास्युटिकल कंपन्यांकडून 110 रुपये प्रति पट्टी दराने विकली जाणारी औषधे 'जेनेरिक आधार' कंपनीकडून केवळ 5 रुपयांना विकली जातात.
आज ही कंपनी देशभरात 2000 हून अधिक मेडिकल स्टोअर्स चालवत आहे. ज्याद्वारे हजारो लोकांना रोजगारही मिळत आहे.
रतन टाटांच्या पाठिंब्यानंतर अर्जुनने जेनेरिक आधारचा देशभरात प्रसार करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी देशभरात 2,000 स्टोअर्स उघडली आहेत ज्यात अंदाजे 10,000 कर्मचारी काम करत आहेत.
सध्या बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, UAE आणि म्यानमार या देशांमध्ये जेनेरिक आधारचा विस्तार होत आहे. अर्जुनच्या म्हणण्यानुसार, तो लवकरच दुबई, ओमान, कंबोडिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये आपले स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अर्जुन देशपांडे याच्या या अनोख्या व्यवसायाचे कौतुक केले आहे. जेनेरिक आधारच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी, हे एक स्तुत्य पाऊल असल्याचे म्हटले. अर्जुनच्या या योगदानाचा सन्मान करताना राष्ट्रपतींनी त्याला फार्मामधील 'वंडर किड' म्हटले आहे. आता अर्जुन देशपांडे ते जनावरांसाठीही औषधाची दुकानेही उघडणार आहेत.
अर्जुन देशपांडे याने सुरू केलेले स्टार्टअपचे आज एका कंपनीत रुपांतर झाले आहे. ज्याचे मूल्यांकन आज 500 कोटी रुपये आहे.
Generic Aadhaar ला 500 कोटी रुपयांच्या मुल्यांकनात प्री-सीरीज A फंडिंगचा भाग म्हणून Beyond Next Ventures या जपानी उद्यम भांडवल कंपनीकडून अघोषित निधी प्राप्त झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.