Divi's Laboratories|Murali Divi Dainik Gomantak
अर्थविश्व

12वीत दोनदा नापास झालेल्या पठ्ठ्याने 500 रुपये घेऊन गाठली अमेरिका अन् उभारली 1 लाख कोटींची कंपनी

Divi's Laboratories: मुरली 12वी मध्ये दोनदा नापास झाले होते तेव्हा कोणालाच माहीत नव्हते की, एक दिवस हा मुलगा 1 लाख कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक होईल. यामागे एकच कारण होते आणि ते म्हणजे मुरलीने अपयशाला बळी न पडणे.

Ashutosh Masgaunde

Success Story of Divi's Laboratories Founder Murali Divi:

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अपयशाचा एक टप्पा येतो, बरेच लोक या अपयशांना बळी पडतात, तर काही लोक या अपयशांशी लढतात आणि यश मिळवतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाची गोष्ट घेऊन आलो आहोत, जो बारावीत दोनदा नापास झाला आणि लोक त्याला टोमणे मारायला लागले.

हे सगळे टोमणे ऐकूणही त्याने हार न मानता मेहनत घेतली आणि तिसऱ्या प्रयत्नात बारावी उत्तीर्ण केली. ग्रॅज्युएशननंतर केवळ ५०० रुपये घेऊन तो अमेरिकेत पोहोचला आणि तिथेच आपला उदरनिर्वाह करू लागला. भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. आज त्या कंपनीची किंमत 1 लाख कोटी रुपये आहे.

मुरली दिव्वी 12वीत दोनदा नापास

Divvy's Laboratories चे संस्थापक आणि MD मुरली दिवी यांचा जन्म 17 मार्च 1951 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात झाला. मुरली यांचे वडील सरकारी कर्मचारी होते, निवृत्तीनंतर त्यांना दरमहा 10,000 रुपये मिळत होते.

मुरली यांच्या कुटुंबात एकूण 14 सदस्य होते, त्याच्या वडिलांना या 10 हजार रुपयांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते.

मुरली यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत झाले, ते 12वीत दोनदा नापास झाले, मग सगळे त्यांना टोमणे मारायला लागले. मात्र मुरली यांनी त्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत तिसऱ्या प्रयत्नात बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला आणि बी. फार्मा केले.

500 रुपये घेऊन अमेरिका गाठली

मुरली यांची कथा एखाद्या चित्रपटासारखी वाटते. बी. फार्मा केल्यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी मुरली 500 रुपये घेऊन अमेरिकाला गेले आणि तिथे फार्मासिस्ट म्हणून काम करू लागले. तेथे त्यांनी अनेक फार्मा कंपन्यांमध्ये काम केले, जिथे त्यांना दरवर्षी सुमारे 54 लाख रुपये कमावले. आता त्यांना फार्मा क्षेत्र चांगले समजू लागले होते, काही वर्षे तिथे काम केल्यानंतर ते भारतात परतले.

अशी सुरू झीली कंपनी

1984 मध्ये, मुरली आणि कलम अंजी रेड्डी यांनी केमिनॉरची स्थापना केली, जी 2000 मध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये विलीन झाली. मुरली 1990 पर्यंत कामिनोर येथे काम करत राहिले. 1990 मध्ये, मुरलीने Divi's Laboratories, APIs, म्हणजेच औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची निर्मिती करणारी प्रयोगशाळा सुरू केली. हळूहळू मुरली व्यवसायात यशाची शिडी चढू लागले.

मुरली यांनी 1995 मध्ये तेलंगणामध्ये पहिले उत्पादन युनिट आणि 2002 मध्ये विशाखापट्टणममध्ये दुसरे युनिट सुरू केले. आज Divi's Laboratories ही फार्मास्युटिकल कच्च्या मालाच्या उत्पादनातील टॉप 3 कंपन्यांमध्ये आहे.

मुरली 12वी मध्ये दोनदा नापास झाले होते तेव्हा कोणालाच माहीत नव्हते की, एक दिवस हा मुलगा 1 लाख कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक होईल. यामागे एकच कारण होते आणि ते म्हणजे मुरली यांनी अपयशाला बळी न पडणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT