Success Story Of Ashutosh Pratihast, Who Warns Five Thousand a Month, Has Built a IDigitalPreneur Company Worth Crores. Dainik Gomantak
अर्थविश्व

Success Story: "तुमचा मुलगा वाया गेलाय!" 5 हजार कमावणाऱ्या आशुतोषने 11 महिन्यांत उभी केली करोडोंची कंपनी

Ashutosh Pratihast: आशुतोषचा जन्म छोट्याश्या खेड्यात झाला. लहानपणापासून खोडकर असलेल्या या मुलामुळे घरचे वैतागले होते. त्याच्या या खोडकरपणामुळे, शेजारचे लोक म्हणायचे, "तुमचा मुलगा वाया गेला आहे."

Ashutosh Masgaunde

Success Story Of Ashutosh Pratihast, Who Warns Five Thousand a Month, Has Built a IDigitalPreneur Company Worth Crores:

आशुतोष प्रतिहस्तचे मुळ गाव बिहारमधील सीतामढी. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पहिल्यापासूनच चांगली होती. यामुळेच वडिलांनी कधी नोकरी केली नाही.

आशुतोष हा त्याच्या गावातील सर्वात खोडकर मुलांपैकी एक होता. तो नुसता इकडे तिकडे हुंदडायचा आणि भांडायचा. त्यामुळे गावकरी त्याच्या आईला म्हणायचे, "तुमचा मुलगा वाया गेला आहे. तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही."

यामुळे आशुतोषची आईही डिप्रेशनमध्ये गेली होती. कालांतराने आशुतोषच्या लक्षात आले की आपल्याला काहीतरी मोठे करावे लागणार आहे. त्याशिवाय आपली चांगली ओळख निर्माण होणार नाही.

आशुतोषच्या खोडकरपणामुळे त्याची आई डिप्रेशनमध्ये गेली होती.

आईचे नैराश्य

आशुतोष राहत असलेल्या सीतामढी गावातील तो सर्वात खोडकर मुलगा होता. त्याच्या खोडसाळपणाने सगळेच त्रस्त झाले होते.

लोक तर म्हणू लागले की आशुतोषमध्ये काही अर्थ नाही. त्याला भविष्य नाही. हे पाहून त्याची आई खूप अस्वस्थ झाली. त्यामुळे ती नैराश्यात गेला. नैराश्यातून बाहेर पडायचे असेल तर त्या वातावरणातून बाहेर पडावे लागेल, असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले.

आशुतोषच्या IDigitalPreneur प्लॅटपॉर्मवर कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र स्वीकारताना विद्यार्थी.

कुटुंबाचे दिल्लीत स्थलांतर

डॉक्टरांच्या सल्ल्याने 2005 मध्ये आशुतोषचे वडील दिल्लीला गेले. तिथे जाऊन काही दिवस काम केले. यानंतर त्यांनी कुटुंबीयांनाही दिल्लीला बोलावले.

आशुतोष आणि त्यांचे कुटुंब दिल्लीला गेले तेव्हाही त्यांची मस्ती सुरूच होती. ते मनात येईल ते करत असे. यामुळे त्याच्या वडिलांना अनेकवेळा अर्थिक फटका बसला होता.

...आणि पैशाची किंमत समजली

आशुतोषला कंटाळलेल्या कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आसाममधील एका केंद्रीय विद्यालयात पाठवले. कारण तिथे शाळेची फी कमी होती. त्यावेळी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.

आसाममध्ये गेल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पैशांची चणचण, भाषेची अडचण यामुळे तो एका वर्षानंतर पुन्हा दिल्लीला परतला. मात्र परतताना त्याला पैशाची किंमत मात्र कळाली.

दहावीत उत्तम गुण

आसामहून परतल्यानंतर आशुतोष आपल्या आई-वडिलांना श्रीमंत कसे व्हायचे हे विचारू लागला. त्याच्या पालकांनी त्याला सांगितले की जर त्याला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याला अभ्यास करावा लागेल.

यानंतर तो चांगला अभ्यास करू लागला. इयत्ता 7 मध्ये, त्याला त्याच्या एका परीक्षेत पैकीच्या पैकी मिळाले. त्यामुळे संपूर्ण शाळेत त्याचे कौतुक व्हायला लागले. त्याच्यासोबत न बसणारी मुलं जवळ येऊ लागली. शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे तिथून लक्षात आले. त्यानंतर त्याने अभ्यासात सातत्य राखत दहावीत खूप चांगले गुण मिळवले.

वडिलांची नोकरी गेली

शाळेत शिकत असतानाच आशुतोषला गिटारची आवड निर्माण झाली आणि तो वाजवायला शिकला. त्याच वेळी तो दहावीत असताना त्याच्या वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती पुन्हा ढासळू लागली.

घरची परिस्थिती पाहून आशुतोषने गिटारचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली. यातून त्यांला महिन्याला 4 ते 5 हजार रुपये मिळू लागले. बारावीत आशुतोषला ९२% गुण मिळाले आणि पुढील शिक्षणासाठी त्याने दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरू महाविद्यालयात प्रवेश घेतला.

स्वतःच्या कंपनीची सुरुवात

आशुतोषवर अनेक जबाबदाऱ्या होत्या. अशा परिस्थितीत त्याला कॉल सेंटरपासून विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या कराव्या लागल्या. त्यामुळे त्याचे यूपीएससीचे स्वप्न भंगले.

या सर्व परिस्थितीतही आशुतोषमध्ये श्रीमंत होण्याची इच्छा जिवंत राहिली. यानंतर त्याची IDigitalPreneur कंपनी सुरू झाली आणि 11 महिन्यांतच कंपनीने अनेक कोटी रुपयांची उलाढाल सुरू केली आहे.

IDigitalPreneur काम

आशुतोष त्याच्या IDigitalPreneur प्लॅटफॉर्मवर परवडणाऱ्या किमतीत अशी कौशल्ये शिकवतो, ज्यामुळे अनेकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात चांगली कामगिरी करता येते. तसेच त्यांना पैसे कमविण्यास मदत होते.

त्याचे 'आशुतोष प्रतिहस्त' नावाचे युट्युब चॅनलही आहे. तो चॅनलवर आर्थिक शिक्षणाशी संबंधित व्हिडिओ टाकत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT