IITian Arunabh Sinha Made A Rs 100 Crore Business Doing Laundry With UClean:
हाथों की ये लकीरें तू बदल दे धीरे-धीरे, मेहनत से ही है निकलें धरती से चमकते हीरे।
बिहारच्या अरुणभ सिन्हा यांच्यासाठी कवितेच्या या ओळी अचूक आहेत. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या अरुणाभ सिन्हा यांनी आपल्या स्टार्टअप Uclean ला अत्यंत कठोर परिश्रमाने मोठ्या उंचीवर नेले आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी आणि कंपनीचे सहसंस्थापक गुंजन तनेजा यांचा वाटाही मोठा आहे.
10 ते 6 खाजगी नोकरी करणारा अभियंता अचानक 93 शहरांतील 323 दुकानांचा मालक बनला. यादरम्यान अरुणाभ यांना अवहेलन सहन करावी लागली तर कधी मोठे नुकसानही सहन करावे लागले. पण, तरीही ते डगमगले नाहीत.
अरुणभ सिन्हा मूळचे बिहारचे असून, त्यांचा जन्म झारखंडमधील जमशेदपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
2008 मध्ये त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. यानंतर एका खासगी कंपनीत चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळाली. पण, काहीतरी करण्याची ऊर्मी असल्याने नोकरीत त्यांचे मन रमेना.
2011 मध्ये त्यांनी पहिला स्टार्टअप सुरू करत मोठे पाऊल टाकले. पण परिस्थिती विरोधात गेली. म्हणून 2015 मध्ये 4 वर्षांपूर्वी सुरू झालेली कंपनी विकावी लागली. मग, पुन्हा नोकरी पकडली. यावेळी एक कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले.
अरुणभ सिन्हा सांगतात की, एका हॉटेलमध्ये नोकरी करत असताना त्यांना समजले की लोकांचे कपडे नीट साफ होत नाहीत. अनेक लॉंड्रीवाले कपडे धूत नाहीत त्यामुळे ग्राहक नाराज असतात.
यातून अरुणाभ यांनी 2016 मध्ये पुन्हा नोकरी सोडून नवीन स्टार्टअप Uclean कंपनीचा पाया घातला.
अरुणाभ सिन्हा यांची Uclean ड्राय क्लीनिंगची कल्पना सर्वांनाच मनोरंजक वाटली. पण, त्यात कोणीही गुंतवणूक करायला तयार नव्हते.
अशा परिस्थितीत दिल्लीतील ड्राय क्लीनिंग स्टोअरच्या मालकाने अरुणभ यांच्या कल्पनेवर विश्वास व्यक्त केला आणि त्याचे दोन स्टोअर यूक्लीनमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याच्याकडे सुपूर्द केले. पण, वसंत कुंज येथील स्टोअरला अचानक आग लागली. अरुणभला पहिल्या महिन्यातच 12 लाख रुपयांचे नुकसान झाले.
तरीही अरुणभच्या जिद्दीला हा अपघात कोणतीही जखम करू शकला नाही. यानंतर अरुणभने फ्रँचायझी मॉडेलवर काम केले. ज्या अंतर्गत 5 लाख रुपयांमध्ये फ्रँचायझी देणे सुरू केले. त्यानंतर हा ताफा वाढतच गेला. त्याची सध्या 93 शहरांमध्ये 323 दुकाने आहेत.
अरुणभ सिन्हा सांगतात की त्यांचे आऊटलेट्स वॉशिंग मशिन, स्टीम आयर्न टेबल्स आणि ड्राय-क्लीनिंग सेटअप्सने पूर्णपणे सुसज्ज आहेत. एक पूर्ण प्रशिक्षित कामगारांची टीम दररोज स्टोअर चालवते आणि व्यवस्थापित करते.
लाँड्री, ड्राय-क्लीनिंग, शू क्लीनिंग, बॅग क्लीनिंग, सॉफ्ट टॉय्स किलोने साफ करणे यासारख्या स्वच्छता सेवा देते. ग्राहक घरपोच पिक-अप आणि डिलिव्हरी घेऊ शकतात किंवा ते त्यांच्या वस्तू देण्यासाठी स्टोअरला भेट देऊ शकतात.
Uclean प्रति किलो कपड्यांसाठी 80 ते 180 रुपये चार्ज करते. यामध्ये कपड्याच्या प्रकारानुसार दर कमी जास्त होतात. कंपनीने अवघ्या 6 वर्षात कंपनीने 100 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
UClean कंपनीने बांगलादेश आणि नेपाळमध्येही आपली दुकाने उघडली आहेत. कंपनीचा भविष्यात आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील आणखी काही देशांमध्ये स्टोअर्स उघडण्याचा विचार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.