Stock Market Danik Gomantak
अर्थविश्व

वर्षातील सर्वात मोठी सुट्टी, आजपासून शेअर बाजार 4 दिवस बंद

या वर्षातील शेवटची शेअर बाजाराची सुट्टी 8 नोव्हेंबर 2022 रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त असेल.

दैनिक गोमन्तक

आज आणि उद्या शेअर बाजारात (Share MArket) कोणताही व्यवहार होणार नाही, तर शनिवार आणि रविवार साप्ताहिक बाजाराची सुट्टी असेल. म्हणजेच संपूर्ण चार दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. स्टॉक मार्केट हॉलिडे (Stock Market Holiday) लिस्टनुसार, 2022 मध्ये शनिवार आणि रविवार वगळता एकूण 13 सुट्ट्या आहेत. यातील सर्वात मोठी सुट्टी आजपासून सुरू होत आहे. या वर्षातील शेवटची शेअर बाजाराची सुट्टी 8 नोव्हेंबर 2022 रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त असेल.

या कारणास्तव बाजार बंद राहणार आहे,

आज, महावीर जयंती / डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 14 एप्रिल आणि उद्या 15 एप्रिलला गुड फ्रायडे असणार आहे म्हणून शेअर बाजार बंद राहणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 14 आणि 15 एप्रिल हे अनुक्रमे गुरुवार आणि शुक्रवार आहेत, त्यामुळे एप्रिलमध्ये जास्तीत जास्त दिवस बाजार बंद राहील. ही सर्वात मोठी सुट्टी असेल कारण 16 आणि 17 एप्रिलला शनिवार आणि रविवार असेल. म्हणजे पूर्ण चार दिवस शेअर मार्केटला सुट्टी.

भारताच्या मल्टी कमोडिटी इंडेक्समधून 14 एप्रिल रोजी ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या भागात सुट्टी असेल. तर दुसऱ्या सत्रातही व्यापार सुरू राहील. पहिले सत्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालते. दुसरे सत्र सकाळी 5 ते रात्री 11.55 पर्यंत चालते. याशिवाय 15 एप्रिल रोजी दोन्ही सत्रांसाठी कमोडिटी मार्केट बंद राहणार आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन सुट्या

भारतीय शेअर बाजाराला 3 मे 2022 रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सुट्टी असेल. या महिन्यात शेअर बाजाराची ही एकमेव सुट्टी असेल. तर ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी तीन सुट्या असतील. जर तुम्ही यादी पाहिली तर, ऑगस्ट 2022 मध्ये, मोहरम, स्वातंत्र्य दिन आणि गणेश चतुर्थी सणांसाठी 9, 15 आणि 31 ऑगस्ट रोजी शेअर सुट्ट्या असतील, त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2022 मध्ये अनुक्रमे 5, 24 आणि 26 तारखेला सुट्ट्या असतील. दसरा, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी बलिप्रतिपदा या सणांसाठी तीन दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवसाय होणार नाही.

यावेळी मुहूर्ताचा व्यवहार 24 ऑक्टोबरला होणार

मुहूर्त ट्रेडिंग 24 ऑक्टोबर 2022 (दिवाळी-लक्ष्मी पूजन) रोजी होईल. मुहूर्त ट्रेडिंग 2022 ची वेळ नंतर सूचित केली जाईल. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये, गुरु नानक जयंती उत्सवासाठी 8 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटला एकच सुट्टी असेल. वर नमूद केल्याप्रमाणे, 2022 मध्ये पडणारी ही शेवटची स्टॉक मार्केट सुट्टी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT