देशात गॅस सिलेंडर दराचा भडका!, सीएनजीच्या दरातही वाढ

गेल्या 8 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळाला असला तरी पाइपलाइनद्वारे घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पीएनजीला पुन्हा एकदा झटका जनतेला बसला आहे.
Gas
GasDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या 8 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळाला असला तरी पाइपलाइनद्वारे घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पीएनजीला पुन्हा एकदा झटका जनतेला बसला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने आजपासून म्हणजेच 14 एप्रिलपासून PNG ची किंमत 4.25 रुपये प्रति घनमीटरने वाढवली. कंपनीने बुधवारी रात्रीच किमती वाढवल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय अंशतः इनपुट गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. (Gas cylinder prices skyrocket in the country CNG prices also go up)

Gas
...म्हणून प्रवासी वाहनांच्या विक्रीत 4 टक्क्यांनी घट

त्याच वेळी, IGL ने CNG (CNG Price Today) च्या किमती मध्ये देखील प्रति किलो 2.50 रुपयांनी वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात 11.60 रुपयांनी वाढ झाली. तर आज सकाळी 6 वाजल्यापासून CNG मध्ये नवीन दर लागू झाले आहेत.

या शहरांना आता 'या' दराने PNG मिळणार

दिल्ली-एनसीआर - 45.86 रुपये प्रति घनमीटर

नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद - 45.96 रुपये प्रति घनमीटर

कर्नाल, रेवाडी - 44.67 रुपये प्रति घनमीटर

गुरुग्राम - 44.06 रुपये प्रति घनमीटर

मुझफ्फरनगर, मेरठ, शामली - 49.47 रुपये प्रति घनमीटर

अजमेर, पाली, राजसमंद - 51.28 रुपये प्रति घनमीटर

कानपूर, हमीरपूर, फतेहपूर - 48.60 रुपये प्रति घनमीटर

एका आठवड्यात महाराष्ट्रात (Maharashtra) सीएनजीच्या किमतीत 12 रुपये प्रति किलो आणि पीएनजीच्या किमतीत 9.5 रुपये प्रति घनमीटरने वाढ झाली. मुंबईत आता सीएनजी 72 रुपये प्रति किलो आहे आणि स्वयंपाकघरात वापरला जाणारा पीएनजी 45.50 रुपये प्रति घनमीटर एवढा असणार आहे.

Gas
केंद्रीय कर्मचाऱ्यांचं स्वस्तात घर खरेदी करण्याचं स्वप्न मोदी सरकार करणार पूर्ण

आजपासून 'या' दराने उपलब्ध होणार सीएनजी

दिल्ली-एनसीआर - 71.61 रुपये प्रति किलो

नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद - 74.17 रुपये प्रति किलो

मुझफ्फरनगर, मेरठ, शामली - 78.84 रुपये प्रति किलो

गुरुग्राम - 79.94 रुपये प्रति किलो

रेवाडी - 82.07 रुपये प्रति किलो

कर्नाल, कैथल - 80.27 रुपये प्रति किलो

कानपूर, हमीरपूर, फतेहपूर - 83.40 रुपये प्रति किलो

अजमेर, पाली, राजसमंद – 81.88 रुपये प्रति किलो

त्याच वेळी, दोन आठवड्यांपूर्वी, दिल्लीत सीएनजीची किंमत प्रति किलो 2.5 रुपयांनी वाढून 66.62 रुपये प्रति किलो एवढी झाली होती. गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडासाठी सीएनजीची किंमत 69.18 रुपये प्रति किलो आहे, तर गुरुग्राममध्ये त्याची किंमत 74.94 रुपये प्रति किलो एवढी आहे. यानंतर, 7 एप्रिल रोजी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने दिल्लीत CNG ची किंमत 2.5 रुपये प्रति किलोने वाढवून 69.11 रुपये प्रति किलो करण्यात आली. या दरवाढीनंतर गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीची किंमत 71.67 रुपये आणि गुरुग्राममध्ये 77.44 रुपये प्रति किलो दर चालू झाला आहे. आता आजपासून या किमतीत आणखी 2.50 रुपयांची वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com