SBI-PNB-BoB  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI-PNB-BoB सह सरकारी बँकांबाबत मोठी घोषणा, तुमचेही खाते असेल तर...

SBI-PNB-BoB Rating: स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक (PNB) सह अनेक सरकारी बँकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

SBI-PNB-BoB Rating: स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक (PNB) सह अनेक सरकारी बँकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमचेही यापैकी कोणत्याही सरकारी बँकेत खाते असल्यास ही महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या… SBI, PNB, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

SBI चे रेटिंग काय आहे?

या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे दीर्घकालीन रेटिंग स्थिर असल्याचे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे. मूडीजने SBI ची दीर्घकालीन स्थानिक आणि विदेशी चलन बँक ठेव रेटिंग Baa3 वर कायम ठेवली आहे, तर इतर तीन PSB ने त्यांचे दीर्घकालीन ठेव रेटिंग अपग्रेड केले आहेत.

कॅनरा आणि पीएनबीचे रेटिंग काय आहे?

SBI चे दीर्घकालीन रेटिंग BAA3 वर कायम ठेवणे आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक आणि PNB यांचे दीर्घकालीन ठेव रेटिंग BAA1 वरुन BAA3 वर श्रेणीसुधारित करणे भारताच्या स्थूल आर्थिक दृष्टीकोनातील सुधारणा दर्शवते. हे देखील गरजेच्या वेळी बँकांना उच्च पातळीवरील सरकारी मदतीची धारणा प्रतिबिंबित करते.

भारतीय अर्थव्यवस्था चांगली होईल

आर्थिक वृध्दी आणि जागतिक मंदीचा भारताच्या आर्थिक विकासावर परिणाम होईल, पण भारतीय अर्थव्यवस्था इतर उदयोन्मुख अर्थव्यस्थेपेक्षा चांगली कामगिरी करेल, असे मूडीजने म्हटले आहे. या घटकांसह, बँकांसाठी ऑपरेटिंग वातावरण आश्वासक राहील.

रेटिंग एजन्सीकडून काय अपेक्षा आहेत?

मूडीजला अपेक्षा आहे की, बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता पुढील दीड वर्षात चांगली राहील, अनुकूल ऑपरेटिंग वातावरण आणि कंपन्यांच्या ताळेबंदात सुधारणा यामुळे मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT