SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका, बँकेने बदलला 'हा' नियम; आता खात्यातून...!

State Bank Of India Latest News: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे

दैनिक गोमन्तक

State Bank Of India Latest News: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल आणि तुमच्या खात्यातून कोणतेही व्यवहार न करता आपोआप पैसे कापले जात असतील तर बँक तुमच्या खात्यातून हे पैसे का कापत आहे, ते जाणून घ्या...?

खात्यातून 147.50 रुपये कापले जात आहेत

सध्या, अनेक ग्राहकांच्या (customer) खात्यातून पैसे आपोआप कापले जात असल्याचे चित्र आहे. यासोबतच 147.50 रुपयांच्या कपातीचा मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत हा मेसेज पाहून अनेक ग्राहक बँकेत पोहोचत आहेत.

बँक दरवर्षी हे पैसे कापते

बँकेच्या बाजूने याबाबत माहिती देताना एसबीआयकडून ग्राहकांच्या खात्यातून हे पैसे डेबिट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक हे पैसे मेंटेनन्स चार्ज म्हणून घेत आहे. हे पैसे बँकेतून वर्षातून एकदाच घेतले जातात. बँकेने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

18% GST असे दिसते

हे पैसे बँकेकडून शुल्क म्हणून कापले जातात. त्याचवेळी, बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डसाठी, ग्राहकांकडून वार्षिक 125 रुपये वसूल केले जातात. 18 टक्के दराने जीएसटी (GST) जोडला जातो, त्यानंतर ही रक्कम 147.50 रुपये होते.

कार्ड बदलूनही पैसे भरावे लागतात

याशिवाय, जर कोणत्याही ग्राहकाला त्याचे डेबिट कार्ड बदलायचे असेल तर त्यासाठी त्याला जीएसटी शुल्कासह बँकेला 300 रुपये भरावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Gram Sabha: हरमल ग्रामसभा 40 मिनिटांत आटोपली, सभेला अल्प प्रतिसाद; घरपट्टी व निरीक्षक नियुक्तीवर नाराजी

Krishna Janmashtami 2026: जन्माष्टमीला 500 वर्षांनंतर जुळून आला 'हा' महासंयोग! 5 राशींच्या हाती लागणार कुबेराचा खजिना; नशीब सोन्यासारखे उजळणार

Weather Update: यंदा ऑगस्‍टपर्यंत 'रेड अलर्ट'विनाच पावसाळा! एकदाही नाही अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अजूनही 29 टक्के तूट

DA Hike: महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाली तर बँक खात्यात किती रुपये जमा होणार? सरकारी कर्मचाऱ्यांनी सोप्या भाषेत समजून घ्या पगाराचे हे संपूर्ण गणित!

Dhyan Foundation: 11 कोटी अनुदान रखडल्‍याने 500 गुरांवर विस्थापनाची वेळ, स्थलांतरासाठी 'ध्‍यान'ने मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT