State Bank of India FD Scheme: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI (SBI FD) द्वारे वेळोवेळी अशा अनेक योजना ग्राहकांसाठी राबवल्या जातात, ज्यामध्ये अधिक व्याजाचा लाभ मिळतो.
एप्रिल महिन्यात SBI ने अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash FD Yojna) लॉन्च केली, ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवून सामान्य FD पेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळतो. आता या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक दिवस शिल्लक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी संपत आहे. उद्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. देशी व्यतिरिक्त विदेशी ग्राहकही या एफडी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
दरम्यान, स्टेट बँकेची ही एफडी योजना 400 दिवसांसाठी आहे. तुम्ही या योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करु शकता. याशिवाय, व्याजाचा लाभ मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आधारावर उपलब्ध आहे. यामध्ये टीडीएस कापल्यानंतर व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.
गुंतवणूकदार (Investors) 400 दिवसांच्या कालावधीसाठी SBI अमृत कलश ठेव योजनेत 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणूक करु शकतात. याशिवाय व्याजाच्या बाबतीत सामान्य गुंतवणूकदारांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने व्याज मिळेल.
या योजनेत कोणत्याही गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8017 रुपये व्याज मिळतील. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीत व्याज म्हणून 8600 रुपये मिळतील.
>> अमृत कलश योजनेत कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
>> या योजनेत तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकता.
>> गुंतवणूकदार अमृत कलश एफडीमध्ये दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात.
>> योनो बँकिंग अॅपद्वारेही (Yono Banking App) तुम्ही यामध्ये गुंतवणूक करु शकता.
>> याशिवाय बॅंक (Bank) शाखेत जाऊनही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.